बिझनेस

एक नंबर! आता कॉलसाठी नसणार SIMची गरज; भारतात पहिल्यांदा Satellite to Device सर्विस सुरू

BSNL ने भारतात Satellite to Device सर्व्हिस सुरू केलीय. बीएसएनएल ही सर्व्हिस सुरू करणारी पहिली कंपनी बनलीय. बीएसएनएलच्या खास सर्व्हिस दूरवरील भाग आणि जेथे नेटवर्क नाही तेथे ही सर्व्हिस सुरू केली जाणार आहे.

Bharat Jadhav

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने देशात Satellite-to-Device सर्व्हिस लॉन्च केलीय. बीएसएनएल ही सेवा सुरू करणारी पहिली टेलिकॉम कंपनी बनलीय. कंपनीने आजपासून ही योजना सुरू केलीय. BSNL D2Dने या तंत्रज्ञानासाठी कॅलिफोर्निया कंपनी वायसॅटशी भागीदारी केलीय. या नव्या सर्व्हिसच्या लॉन्चिंगची माहिती दूरसंचार विभागने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिलीय. चला तर जाणून घेऊ या नव्या सर्व्हिसविषयी.

काय आहेत फायदे

बीएसएनएलने ही सेवा अशा भागात सुरू केलीय. जे प्रदेश खूप दूर आहेत. डोंगराळ भागात आहेत. तसेच तेथे कोणत्याचप्रकारचे नेटवर्क नसेल तेथे नेटवर्क सुविधा दिली जाईल. जंगल भाग आणि डोंगराळ भागात ही सेवा पुरवली जाणार आहे. दरम्यान या सेवेची माहिती देताना बीएसएनएल कंपनीने एक खास व्हिडिओ पोस्ट केलाय. यात सॅटेलाईट-टू- डिव्हाइसची झलक दाखवण्यात आलीय.

जेथे सेलुलर नेटवर्क नाहीये किंवा वाय-फाय सेवा जेथे नाही, तेथे ही सेवा पुरवली जाणार आहे. युझर्स या सर्व्हिसमधून कॉलिंगसह एसओएस म्हणजेच इमरजन्सी मेसेजही पाठवू शकतात. तसेच युझर्स युपीआय पेमेंट करू शकतील. परंतु कंपनीने अद्याप हे स्पष्ट केलं नाही की ही सेवा एसएमएस किंवा सामान्य कॉलसाठी उपलब्ध असेल किंवा नाही. सर्वात आधी अॅपल कंपनीने आयफोन १४ सीरिजसह या फीचर्सला बाजारात आणलंय. परंतु ही सेवा भारतात उपलब्ध नाहीये.

दरम्यान काही दिवसांपूर्वी Viasat ने भारतात बीएसएनएलसह दुसऱ्या कंपन्यासोबत सॅटेलाइट सर्व्हिस सेवा सुरू करणार असल्याची माहिती दिली होती. ट्रायलमध्ये Viasatने टू-वे कम्युनिकेशन आणि इमरजन्सी एसओएस मेसेज सर्व्हिसचा डेमो दाखवण्यात आला होता. या सर्व्हिसचा डेमो एका कमर्शिअल अँड्रारॉईड स्मार्टफोनच्या माध्यमातून नॉन-टेरेस्ट्रियल नेटवर्क कनेक्टिविटीचा वापर करण्यात आला होता.

याच्या माध्यमातून ३६ हजार किलोमीटर दूर Viasat च्या एल- बॅड सॅटेलाईटला मेसेज पाठवण्यात आला होता. इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये Viasat ने सांगितलं त की, डायरेक्ट - टू- डिव्हाइस कनेक्टिविटी एक नवी टेक्नोलॉजी आहे. जे मोबाईल, स्मार्टवॉच, कारसह इंडस्ट्रिअल मशिनरी आणि ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स सहजपणे सेवेशी कनेक्ट राहण्यास सक्षम असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Pawar vs Pawar: पवार कधीच एक होणार नाहीत? वैयक्तिक नव्हे वैचारिक मतभेद: शरद पवार

SCROLL FOR NEXT