BPCL's New 10 Kg LPG Cylinder to Offer Quick Delivery and Affordable Cooking Fuel 
बिझनेस

LPG Cylinder Price: ग्राहकांना आता मिळणार १० किलोचा सिलिंडर; डिलीव्हरीही होईल झटपट, जाणून घ्या किती असेल किंमत?

LPG Cylinder Price: सिलिंडरच्या अनुपलब्धतेमुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला., परंतु आता ही परिस्थिती बदलणार आहे. BPCL ने आपल्या ग्राहकांसाठी १० किलोचा नवीन सिलिंडर आणलाय.

Bharat Jadhav

  • BPCL ने ग्राहकांसाठी नवीन १० किलोचा LPG सिलिंडर बाजारात आणला.

  • लहान आकारामुळे डिलिव्हरी जलद आणि वापर अधिक सोयीस्कर होणार.

  • नवीन गॅस कनेक्शन मिळवणे आता अधिक सुलभ होणार आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी कोणालाही विशेष त्रास सहन करावा लागणार नाही. काही महिन्यांपूर्वी सिलिंडरच्या अनुपलब्धतेमुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, परंतु आता तशी परिस्थिती राहणार नाहीये.

BPCL ने १० किलोचा नवीन सिलिंडर बाजारात आणलाय. कोणताही ग्राहक आता सहजपणे त्याचे नवीन कनेक्शन घेऊ शकतो. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खन्ना आणि संचालक शुभंकर सेन यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

काय आहे विशेष

'मिंट'च्या एका वृत्तानुसार बीपीसीएलने (BPCL) 'भारत गॅस लाइट झिप' (Bharat Gas Lite Zip) नावाची एक नवीन सेवा सुरू केलीय. या सेवेद्वारे त्वरित एलपीजी (LPG) कनेक्शन मिळते आणि सिलिंडरची अत्यंत जलद डिलिव्हरी देखील केली जाईल. बीपीसीएलने (BPCL) 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.

भारत गॅसच्या 'लाइट झिप' (Lite Zip) सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे १०-किलोग्रॅमचा सिलिंडर.बीपीसीएलच्या मते, हा सिलेंडर प्रमाणित सिलेंडरपेक्षा खूपच हलका आणि गंज-रोधक आहे. या सिलेंडरचा मुख्य भाग पारदर्शक असल्याने त्यातील गॅसची पातळी सहजपणे तपासता येते. याची आधुनिक रचना आणि उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये याला अधिक खास बनवतात.

याची किंमत किती असेल?

बीपीसीएलने (BPCL) 'भारत गॅस लाइट झिप' (Bharat Gas Lite Zip) ही सेवा सर्वप्रथम मुंबईत सुरू केली आहे. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत २४ राज्यांमधील आणखी १०० शहरांमध्ये ही सेवा विस्तारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. किंमतीचा विचार करता, ५ किलोचा सिलिंडर ८०८.५ रुपयांना उपलब्ध आहे. दरम्यान दिल्लीमध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९४२ रुपये आहे.

मात्र, १० किलोच्या सिलिंडरची किंमत किती असेल, याबाबत कंपनीने अजून कोणतीच माहिती दिली नाहीये. नवीन कनेक्शनसाठी ग्राहकांना ३,००० ते ४,००० रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो आणि केवळ सिलिंडरची किंमत १,५०० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- रायगडचा पालकमंत्री कोणाला करायचं हे तिन्ही नेते एकत्र बसून लवकर निर्णय घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

Fashion Tips : या कारणामुळेच काही कपडे घातल्यावर चेहरा उजळतो आणि काहींमध्ये डल दिसतो!

Testicular Cancer: डॉक्टरांची कमाल! कॅन्सरग्रस्त वृषणातून शोधले २३ जिवंत स्पर्म्स, तरुणाचं बाबा होण्याचं स्वप्न होणार पूर्ण

'रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; काही तासांच्या फरकाने मुंडे भावंडांनी दिले राजकीय निवृत्तीचे संकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Dombivli: डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून सुरु होणरा वॉटर मेट्रो; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT