BOI Recruitment Saam Tv
बिझनेस

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

Bank of India Recruitment 2025: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत क्रेडिट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी

क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

बँकेत सरकारी नोकरी करावी, असं अनेकांचे स्वप्न असते. बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसंदर्भात नोटिफिकेशन जारी केले आहे.

बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २० डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी bankofindia.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.

बँक ऑफ इंडिया क्रेडिट मॅनेजरची ही भरती GBO स्ट्रीमसाठी आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची नियुक्ती मॅनेजमेंट ग्रेड स्केल I, मिडल मैनेजमेंट ग्रेड स्केल-III आणि सीनियर मैनेजमेंट ग्रेड स्केल-IV साठी होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

बँक ऑफ बडोदामध्ये एकूण ५४० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी २५ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६४,८२० ते १२०९४० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

क्रेडिट ऑफिसर (MMGS-II) स्केल पोस्टसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत त्यांच्याकडे ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. क्रेडिट ऑफिसर (MMGS-II) साठी ग्रॅज्युएशनसह ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. क्रेडिट ऑफिसर SMG-IV साठी ग्रॅज्युएशन आणि ८ वर्षांचा अनुभव असावा.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला bankofindia.bank.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर न्यू रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करायचे आहे. यानंतर ईमेल, मोबाईल नंबर ही माहिती भरायची आहे.

यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचे आहे. यानंतर तिथे संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.

यानंतर संपूर्ण फॉर्म भरा. फोटो आणि सही अपलोड करा. यानंतर फी भरुन फॉर्मची प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

मुंबई महापालिकेचा प्रचार, अदानींवरुन वॉर, मुंबई विमानतळाची जागा कुणाच्या घशात?

आम्हाला सत्ता द्या, दत्तक बाप उद्या यायला घाबरला पाहिजे; नाशिकमधून उद्धव ठाकरे कडाडले

Raj Thackeray: कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

घरातून बाहेर पडताना गोड पदार्थ खाऊन निघा; ५ राशींच्या लोकांना आयुष्यातील सर्वात मोठं यश मिळणार

SCROLL FOR NEXT