Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: १० लाख महिलांच्या खात्यात आज खटाखट जमा होणार ₹१०,०००; मुख्यमंत्री करणार ट्रान्सफर

Bihar Government Mukhyamantri Mahila Rojgar Yojana: बिहार सरकार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत १०,००० रुपये दिले जाणार आहेत. महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०-१० हजार रुपये जमा करणार आहेत.

Siddhi Hande

बिहार सरकारची मुख्यमंत्री महिला रोजगार योजना

आज महिलांना मिळणार प्रत्येकी ₹१०,०००

१० लाख महिलांना मिळणार पैसे

सरकारने महिलांना खुशखबर दिली आहे. आज बिहार सरकार महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०-१० हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहे. बिहार सरकार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत १०००० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

बिहार सरकार आज जिविका दीदी स्कीमअंतर्गत हे पैसे दिले जाणार आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील ९.५ लाख महिलांना लाभ मिळणार आहे. ५०,००० महिला या शहरी भागातील आहेत. एकूण १० लाख महिलांच्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना पैसे मिळणार आहे.

बिहारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, महिलांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे दिले जाणार आहे. सर्व लाभार्थ्यांना १४ डिसेंबरपर्यंत पैसे मिळतील.

बिहार सरकारने आतापर्यंत १ कोटी ४० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. आता उरलेल्या सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. यासाठी शेवटची तारीख १४ डिसेंबर आहे. दरम्यान, या योजनेत महिलांनी जर त्यांचा व्यवसाय योग्य पद्धतीने सुरु केला तर त्यांना २ लाखांपर्यंतची मदत केली जाणार आहे.

या योजनेमुळे बचत गटातील महिलांना खूप फायदा होणार आहे. त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण भागातील महिला या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात हे यामागे उद्दिष्ट आहे.

महिला ड्रायव्हर किंवा कंडक्टरसाठीही करु शकतात अर्ज

मंत्री श्रवण कुमार यांनी सांगितले की, जिविका दीदी कंडक्टर किंवा ड्रायव्हरसाठी ट्रेनिंग घेऊ शकतात. यासाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर बिहार स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन महिलांना पिंक बस चालवण्यासाठी अपॉइंट करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक, टोळीला अटक

Mumbai Beaches : विकेंडला फिरायला जायचा प्लॅन करताय? मग मुंबईजवळील या बीचला नक्की भेट द्या

Face care: हिवाळ्यात चेहरा ड्राय झालाय? पण, लग्नसराईसाठी ग्लोईंग फेस पाहिजे? मग, ट्राय करा हा होममेड मास्क

Bavdhan Tourism: वीकेंडला थंड हवा, हिरवळ, सूर्योदयाचं सुंदर दृश्य पाहायचंय? बावधनजवळील आहे Hidden टेकडी, मित्रांसोबत धमाल करण्यासाठी स्पॉट

Politics: 'उमेदवारी अर्ज माघारी घे, नाहीतर...', घरात घुसून महिला उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT