Siddhi Hande
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसी तुम्ही मोबाईलवरुन ऑनलाइन पद्धतीने करु शकतात.
सर्वात आधी तुम्हाला https://www.ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर केवायसीच्या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल तो टाकायचा आहे. कॅप्चा कोडदेखील टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला वडिलांचे किंवा पतीचे केवायसी करायचे आहे. त्यासाठी त्यांचा आधार नंबर आणि लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
यानंतर त्यांच्याही फोनवर ओटीपी येईल. तो टाकावा.
यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची योग्य उत्तरे द्या. यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली असा मेसेज येईल.
हा मेसेज आल्यावर तुमची केवायसी पूर्ण होईल.