Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रात स्वप्न शास्त्राला विशेष महत्व आहे. स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टी तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या शुभ - अशुभ घटनांची माहिती देतात.
तुम्हाला स्वप्नात काही प्राणी दिसल्यास शुभ संकेत मिळते. ते प्राणी कोणते हे जाणून घेऊया.
सकाळी स्वप्नात हत्ती दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही स्वप्नात हत्तीवर स्वत:ला स्वार होताना पाहिले तर ते लकी असते. गर्भवती महिलेला स्वप्नात हत्ती दिसल्यास शुभ मानले जाते.
माकड हे हनुमानाचे रूप आहे. स्वप्नात तुम्हाला माकड उडी मारताना, खेळताना दिसला तर ते शुभ मानले जाते तुमचे नशीब लवकरच चमकणार असल्याचे संकेत मिळते.
ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सिंह दिसल्यास भविष्यात राजयोग प्राप्त होतो. स्वप्नात सिंह दिसणे म्हणजे तुमच्या कामात प्रगती होण्याचे संकेत मिळते.
तुम्हाला स्वप्नात बिळात साप दिसला तर तुम्हाला अचानक पैसे मिळण्याचे संकेत मिळते. तुम्हाला काळा साप दिसल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतील , तुमची प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.