Manasvi Choudhary
किचन स्वच्छ ठेवणे हे अत्यंत महत्वाचं आहे. महिला व मुली नियमितपणे किचनची साफ सफाई करतात.
अनेकदा किचन बेसिनमध्ये खराब अन्न, खरकटलेली भांडी याचा पसार असतो अशावेळी किचन साफ करणे अवघड होते.
किचन साफ करण्याची सोपी पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या प्रमाणे तुम्ही घरीच अगदी सहजरित्या किचन साफ करू शकता त्यावरील काळे डाग काढू शकता.
किचन बेसिन धुण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता. गरम पाण्यामुळे किचनमधील घाण स्वच्छ होईल.
एका बादलीत लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करा ते किचन बेसिनमध्ये लावा काहीवेळाने बेसिन धुवून घ्या यामुळे काळे डाग देखील निघून जातील.
एका मोठ्या बादलीत गरम पाण्यामध्ये साबण मिक्स करा आणि हे पाणी तुम्ही बेसिनमध्ये टाका असे केल्याने देखील बेसिन स्वच्छ होईल.
किचनमधील बेसिन नियमितपणे स्वच्छ केल्याने त्यावर डाग पडत नाही ते चमकदार राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.