Manasvi Choudhary
अनेकांना गोड लापशी खायला आवडते. टेस्टी अन् हेल्दी लापशी खाल्ल्याने पोट देखील भरल्यासारखे वाटते.
लापशी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लापशी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने लापशी बनवू शकता
लापशी बनवण्यासाठी सर्वात पहिले गव्हाचा भरडा, गूळ, साजूक तूप, वेलची, ड्रायफ्रुट्स, हे साहित्य एकत्र करा. लापशी बनवण्यासाठी गॅसवर कुकरमध्ये गव्हाचा भरडा आणि पाणी घालून चांगला शिजवून घ्या.
यानंतर या तयार मिश्रणात गूळ, साजूक तूप, वेलची आणि जायफळ घालून मिश्रण मिक्स करा. गूळ मिक्स करून मिश्रणावर झाकण ठेवून चांगले शिजवून घ्या.
यानंतर या मिश्रणात ड्रायफ्रुट्स मिक्स करा म्हणजे लापशी चवीला अत्यंत चवीष्ट लागेल. लापशीमध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे करून टाका.
अशाप्रकारे मस्त गरमा गरम लापशी सर्व्हसाठी तयार असेल. तुम्ही ती खाऊ शकता.
येथे दिलेली रेसिपी माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. रेसिपी बनवण्यासाठी योग्य सल्ला घ्या.