Manasvi Choudhary
हिवाळ्यात वातवरणीय बदलामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्वचेच्या समस्या उद्भवतात.
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होते. यासाठी आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत.
सकाळी अंघोळ केल्यानंतर तुम्ही त्वचेला नारळाचे तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.
दहीमध्ये थोडेस मध मिक्स करून ते देखील तुम्ही त्वचेवर लावू शकता. त्वचा मऊ होईल.
दुधामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅट्स असतात जे त्वचेला पोषण देतात यामुळे दूध आणि बदाम तेलाने त्वचेला मालिश करा.
कोरड्या त्वचेवर तुम्ही मॉइश्चरायझर देखील लावू शकता यामुळे त्वचा मऊ होते.
रात्री त्वचेला बदाम तेल लावल्याने देखील त्वचा मऊ होते. तुम्ही सकाळी अंघोळ केल्यानंतर देखील लावू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.