Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला हेल्दी अन् टेस्टी खाण्याची शरीराला गरज असते. अनेकजण सकाळी नाश्त्याला चटपटीत पदार्थ देखील खातात.
तुम्हाला आज आम्ही ब्रेड पकोडा रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने ब्रेड पकोडा बनवू शकता.
ब्रेड पकोडा बनवण्यासाठी तुम्हाला ब्रेड, बटाट्याची भाजी बेसन, तांदूळ पीठ, हळद, जिरे, खायचा सोडा, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
ब्रेड पकोडा बनवण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला बटाटे शिजवून त्याची कांदा, जिरं, मोहरी, हळद मिक्स करून भाजी तयार करायची आहे.
एका मोठ्या भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. या मिश्रणात पाणी घाला. पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या
ब्रेड स्लाईसच्या कडा काढा, प्रत्येकी एक ब्रेडला बटाटा भाजी लावा त्यावर दुसरा ब्रेड लावा. गॅसवर कढईत गरम तेलामध्ये ब्रेड पकोडा तुम्हाला पिठात मिक्स करून तेलात सोडायचे आहेत.
ब्रेड पकोडा चांगले तळल्यानंतर तुम्ही ते टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.