Yellow Batata Bhaji: उकडलेल्या बटाट्याची पिवळी झणझणीत भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

बटाटा

बटाटा हा पदार्थ सर्वांनाच खूप आवडतो. बटाट्याचे विविध रेसिपी केल्या जातात. आज आपण बटाट्याची पिवळी झणझणीत भाजी कशी बनवायची ही रेसिपी जाणून घेणार आहोत.

Batata Vada Recipe | Scoial media

साहित्य

बटाट्याची पिवळी भाजी बनवण्यासाठी बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, कांदा, लाल तिखट, हळद, धनापावडर, मीठ, कोथिंबीर, लिंबू रस हे साहित्य एकत्र करा.

Yellow Batata Bhaji | yandex

बटाटे उकडून घ्या

बटाटे भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. उकडलेले बटाटे सोलून त्याचे मध्यम आकारात तुकडे करा.

Boiled potatoes | yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. यानंतर मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग होईपर्यत परतून घ्या.

Fodni

मसाले घाला

मिश्रणात हळद, लाल मसाला, धनापावडर मसाले चांगले मिक्स करा आणि परतून घ्या. या मिश्रणात उकडलेल्या बटाट्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून भाजी परतून घ्या.

spices

कोथिंबीर घाला

सर्व मिश्रणात आता वरतून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला म्हणजेच गरमा गरम बटाट्याची भाजी सर्व्हसाठी तयार आहे.

Chopped coriander | Social Media

टिप

येथे दिलेली ही रेसिपी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य माहिती घ्या.

Yellow Batata Bhaji |

next: Hirve Moong Bhaji Recipe: हिरव्या मुगाची झणझणीत भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा..