Petrol Diesel Rate Today in Maharashtra Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Prices : अर्थसंकल्पापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, वाचा नवे दर

Petrol Diesel Rate Today in Maharashtra : अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या एक दिवसआधी देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले आहेत.

Satish Daud

आज म्हणजेच सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? याकडे अनेकांच्या नजरा आहे. अशातच अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या एक दिवसआधी देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले आहेत.

तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरानुसार, आज उत्तरप्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमती घसरल्या आहेत. जागतिक बाजारातही कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. उत्तरप्रदेशच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात पेट्रोल १५ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरातही १८ पैशांनी कमी झाले आहेत.

गाझियाबादमध्ये पेट्रोल १२ पैशांनी तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोलचे दर १४ पैशांनी घसरले आहे. डिझेलच्या दरातही १४ पैशांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईसह पुणे आणि इतर महत्वाच्या शहरात इंधनाचे दर स्थित आहेत.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर

  • मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १००.७६ रुपये आणि डिझेल ९२.३५ रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल ९५ रुपये. आणि डिझेल ९१.७६ रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये बदलले इंधनाचे दर

  • गाझियाबादमध्ये पेट्रोल ९४.५३ रुपये आणि डिझेल ८७.६१ रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • नोएडामध्ये पेट्रोल ९४.६६ रुपये आणि डिझेल ८७.७६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • गुरुग्राममध्ये पेट्रोल ९४.९७ रुपये आणि डिझेल ८७.८४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT