BEST Mumbai recruitment 2026 google
बिझनेस

BEST Jobs: बेस्टमध्ये काम करण्यांची संधी, 686 कर्मचाऱ्यांची भरती; वाचा सविस्तर...

BEST Mumbai Recruitment 2026: मुंबईपासून पावसाळ्यातील वीजपुरवठा समस्यांवर उपाय म्हणून BEST ने 686 नवघाणी कर्मचाऱ्यांची भरती जाहीर केली असून तक्रारींसाठी कॉल सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sakshi Sunil Jadhav

पावसाळ्यात वीजपुरवठेच्या समस्यांना शहरातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्युतपुरवठा विभागतल्या वाढत्या तांत्रिक कामांचा ताण लक्षात घेऊन, तात्पुरत्या स्वरुपात ६८६ नवघाणी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव केला आहे.

मंगळवारी झालेल्या BEST समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच पावसाळ्यात वीजेसंबंधीत तक्रारींवर तक्रारींना लगेचच प्रतिसाद देण्यासाठी कॉल सेंटर सुरु करण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे. यामध्ये २ प्रमुख विभाग कले आहेत. पहिला विभाग म्हणजे वाहतूक आणि दुसरा म्हणजे विद्युत. त्यातल्या विद्युत विभागाचं काम पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढतं.

खोदकाम, उपकेंद्रांमध्ये केबल टाकणे, तसेच यंत्रसामग्रीची ने-आण करणे यांसारखी कामं मोठ्या प्रमाणात वाढतात. ही सगळी कामं नैमित्तिक कामगारांना म्हणजेच Casual Labour यांच्या मदतीने केली जातात. दरवर्षी १५० कर्मचारी निवृत्त होतात. त्यामुळे ही कमी भरुन करण्यासाठी ही भरती सुरु केली आहे.

यंदा एकूण ६८६ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी प्रशासकीय आदेश ९४ अंतर्गत ३३६ आणि आदेश १५८ अंतर्गत ४३२ अर्ज प्रलंबित (Pending) आहेत. त्यातील पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसेच विद्युतपुरवठा विभागाच्या मंजूर संख्याबळाव्यतिरिक्त आणखी २४५० तात्पुरती पदे निर्माण करण्याचा प्रस्तावही समोर आला आहे. सध्या या विभागात २४०४ मंजूर पदांपैकी २२३३ कर्मचारी कार्यरत असल्यामुळे १९६२ कायमस्वरूपी आणि २७१ तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT