वयाच्या ५० साव्या वर्षी ५ कोटी रुपयांचा निधी तयार करणं हे आता अवघड राहिलेलं नाही. योग्य नियोजन आणि नियमित गुंतवणुकी करुन तुम्ही भविष्यात मोठा नफा मिळवू शकता.
सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP म्हणजे दरमहिना ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवण्याची एक शिस्तबद्ध पद्धत. या पद्धतीत बाजारातील चढउतारांकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन कालावधीत स्थिर परतावा मिळवता येतो.
जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या २५व्या वर्षी दरमहा ३०,००० रुपये SIP मध्ये गुंतवायला सुरुवात केली, तर २५ वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या ५०व्या वर्षी त्याच्याकडे १, २ कोटी नाही तर ५ कोटी रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.
१२ टक्के वार्षिक परतावा गृहीत धरल्यास, ९० लाख रुपयांची एकूण गुंतवणूक चक्रवाढ व्याजामुळे ५ कोटींपर्यंत वाढू शकते. परतावा १५ टक्क्यांपर्यंत गेला, तर फक्त २५,००० रुपयांचा SIP सुद्धा पुरेसा ठरू शकतो.
स्टेप-अप SIP च्या मदतीने दरवर्षी गुंतवणूक १० टक्क्यांनी वाढवली, तर उद्दिष्ट आणखी लवकर साध्य होऊ शकतं. मात्र यासाठी मासिक उत्पन्न किमान १ लाख रुपये असणे आवश्यक आहे.
जेणेकरून इतर खर्चांवर परिणाम न होता गुंतवणूक सुरू ठेवता येईल. लार्ज-कॅप आणि मल्टी-कॅप फंडांमध्ये बॅलेन्स राखल्यास गुंतवणूकीतून दीर्घकालीन स्थिर परतावा मिळतो. योग्य नियोजन, शिस्त आणि संयम बाळगल्यास SIPने तुम्ही करोडपती होऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.