Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही क्लासशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक ; २२ व्या वर्षी IAS झालेल्या अनन्या सिंह आहेत तरी कोण?

Success Story Of IAS Ananya Singh: आयएएस अनन्या सिंह यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्या २२ व्या वर्षीच आयएएस झाल्या. त्यांनी खूप कमी वयात यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

प्रत्येकाची काही न काही स्वप्न असतात. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी व्यक्ती मेहनत घेते ती नक्कीच यशस्वी होते. यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु पहिल्या प्रत्नात अनेकदा यश मिळत नाही. अनेक वर्षे सतत अभ्यास करावा लागतो तेव्हा आपल्याला यश मिळते. आयएएस अनन्या सिंह यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली. त्यांनी २२ व्या वर्षी ही सर्वात कठीण परीक्षा क्रॅक केली.

अनन्या सिंह (IAS Ananya Singh) यांचा जन्म प्रयागराजचा. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांना पुस्तके वाचायला खूप आवडायचे. अनन्या यांनी आपले शालेय शिक्षण सेंट मेरीज कॉन्वेंट स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी १२वीत ९८.२५ टक्के मिळवले. त्यांनी आपल्या जिल्ह्यात टॉप केले होते.

अनन्या यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी आयएएस व्हायचे ठरवले होते. यासाठी त्यांनी ग्रॅज्युएशनसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती. त्यांनी ३ वर्षांसाठी आठ-आठ तास अभ्यास केला.

अनन्या यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय सेल्फ स्टडी करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी रोज ७-८ तास काम केले. अनन्या सिंह या २२ व्या वर्षी आयएएस अधिकारी झाल्या. त्यांनी २०१९ मध्ये ५१ रँक मिळवली होती. त्या सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

SCROLL FOR NEXT