Bank News Saam Tv
बिझनेस

Bank News : १ एप्रिलपासून बदलणार बँकांचे नियम, आताच जाणून घ्या, अन्यथा...

Banking News : देशभरातील सर्व बँकामधील चार नियम १ एप्रिलपासून बदलणार आहेत. बँकांच्या कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे? त्याचा परिणाम कोणावर होणार आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

Yash Shirke

१ एप्रिल २०२५ पासून देशभरातील बँकिंगचे नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम दैनंदिन व्यवहार करताना होणार आहे. बँकांचे नियम बदलल्याने सेव्हिंग अकाउंट, क्रेडिट कार्ड आणि एटीएम ट्रांजॅक्शन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत असे म्हटले जात आहे. बँकेच्या कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत? जाणून घेऊयात...

1. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याची मंजूरी दिली आहे. यामुळे हॉम बँक नेटवर्कच्या बाहेरील एखाद्या एटीएममधून पैसे काढणे किंवा खात्यातील शिल्लक तपासणे पूर्वीपेक्षा खर्चिक होईल. आधी एटीएममधून पैसे काढताना १७ रुपये फी होती. आता फी म्हणून १९ रुपये घेतले जाणार आहेत. एटीएममध्ये बॅलेन्स चेक करताना आधी ६ रुपये लागायचे, आता ७ रुपये द्यावे लागणार आहेत.

2. डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी बँका नवनवीन फीचर्स जोडत आहेत. आता ऑनलाइन बँकिंगद्वारे ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगल्या सेवा मिळू शकेल. एआयवर आधारित चॅटबॉट्सचा वापर बँकामध्ये केला जाणार आहे. डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यासारखी सुरक्षा सुरु केली जाणार आहे.

3. एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक अशा काही बँकांमध्ये मिनिमम बॅलेन्सशी संबंधित नियम बदलले जाणार आहेत. तुमचे बँकेतील खाते शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण यांपैकी कोणत्या ठिकाणी आहे, यावरुन मिनिमम बॅलेन्सचे नियम ठरवले जातील. याशिवाय निर्धारित रकमेपेक्षा कमी बॅलेन्स असल्यावर वापरकर्त्यांना दंड भरावा लागेल.

4. १ एप्रिलपासून अनेक बँका सेव्हिंग अकाउंट आणि एफडीवरच्या व्याजदरात बदल करणार आहेत. एप्रिल २०२५ पासून सेव्हिंग अकाउंटवरील व्याज खात्यातील शिल्लक रकमेवर (मिनिमम बॅलेन्स) अवलंबून असेल. थोडक्यात जितका मिनिमम बॅलेन्स असेल, तितका रिटर्न तुम्हाला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT