Credit Card News Saam Tv
बिझनेस

EMI, Credit Card चे Bill वेळीच भरा, अन्यथा आर्थिक अडचणींना जावे लागेल सामोरे

Credit Card: जर एखादी व्यक्ती कर्ज घेण्यासाठी किंवा नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल तर त्या व्यक्तीचे बॅकग्राउंड तपासले जाते. त्या व्यक्तीचा बँकेचे कर्ज परतफेड करण्याचा इतिहास तपासला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Credit Card History:

आजकाल सर्व गोष्टी खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. बजेट नसल्यास अनेकदा लोक क्रेडिट कार्डवर वस्तू खरेदी करतात. क्रेडिट कार्डचा वापर करताना जपून करायचा असतो. पैसे वेळच्या वेळी भरायचे असतात. जर तुम्ही पैसे भरले नाही तर बँकेकडून कारवाई होते. तसेच नवीन क्रेडिट कार्ड घेताना अनेक अडचणी येतात.

जर एखादी व्यक्ती कर्ज घेण्यासाठी किंवा नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल तर त्या व्यक्तीचे बॅकग्राउंड तपासले जाते. त्या व्यक्तीचा बँकेचे कर्ज परतफेड करण्याचा इतिहास तपासला जातो.

कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने कधी बँकेची फसवणूक किंवा कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाल्याची तक्रार आहे का हेदेखील पाहिजे जाते. CIBIL अहवालात व्यक्तीची आर्थिक आणि वैयक्तिक माहिती असते. जेव्हा एखादा ग्राहक कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा बँक त्याचा CIBIL अहवाल आणि CIBIL स्कोर तपासतात.

प्रशासकीय कामांमुळे एखाद्या व्यक्तीच्या CIBIL अहवालात चुकीची माहिती नोंदवली जाते. ज्यामुळे त्या व्यक्तीचा CIBIL अहवाल आणि CIBIL स्कोर समजत नाही. त्यामुळे कर्ज घेण्याच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो.

तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोर वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नेहमी क्रेडिट कार्डचे पैसे वेळच्या वेळी भरा.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड हे बँकेचे कार्ड असते. हे कार्ड वापरून तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करु शकतात. जर तुमच्या बजेटमध्ये एखादी वस्तू नसेल तर ती तुम्ही क्रेडिट कार्डवर खरेदी करु शकता. त्यानंतर काही कालावधीनंतर हे पैसे भरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीनं जिंकली नाणेफेक, गुजरातला दिलं फलंदाजीचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: औंढा नागनाथ परिसरात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा उत्साह

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा १५०० रुपये मिळणार? सुप्रिया सुळेंची फडणवीस सराकारकडे मोठी मागणी

Fort In Nashik : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

Monday Horoscope: कामाच्या ठिकाणी कौतुक होणार, ५ राशींचे बढतीचे योग आहेत; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT