Bank Of Badoda Recruitment Saam Tv
बिझनेस

Bank Job: सरकारी बँकेत मिळवा नोकरी! 1100 पदांसाठी भरती, महिन्याला कमवा 93,000 रुपये

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळवण्याची अनेकांना सुवर्णसंधी आहे. या बँकेत ११०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज कुठे आणि कसा करायचा ते घ्या जाणून...

Priya More
  • बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती होणार

  • बँक ऑफ बडोदामध्ये ११०० पदांसाठी भरती

  • वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट एनालिस्ट ही पदं भरली जाणार

  • अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली

बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल ११०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज भरावा. या भरती प्रक्रियेअंतर्गत नोकरी मिळवलेल्या उमेदवाराला दरमहा ९३,००० रुपये पगार मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाने वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागांमध्ये १,१०० नियमित स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. BOB/HRM/REC/ADVT/2026/17 या जाहिरात क्रमांकाअंतर्गत अधिसूचित केलेल्या या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया ४ सप्टेंबर म्हणजे आजपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार bankofbaroda.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उशिर न करता उमेदवारांनी आताच अर्ज भरावा.

बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती केली जाणार आहे. वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी १००० जागा भरल्या जाणार आहेत. तर क्रेडिट अॅनालिस्टच्या १०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज आणि शुल्क तुम्ही ४ सप्टेंबरपासून ते २४ सप्टेंबरपर्यंत भरू शकता. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०२६ आहे. वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळेल. तर क्रेडिट अॅनालिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६४,८२० ते ९३,९६० रुपये पगार मिळेल.

वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट अॅनालिस्ट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३३ वर्षे इतकी असावी. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर / पदवीधर + सीए असावा आणि त्याच्याकडे पदानुसार अनुभव आणि प्रमाणपत्र असावे. उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/दिव्यांग/महिला/माजी सैनिक या वर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क द्यावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरे मेट्रो स्टेशनजवळ बसला भीषण आग

Healthcare Tips : पिरियड्समध्ये थकवा आणि पोटदुखी वाढतेय? या 7 चुका तर करत नाही ना?

Vidyanand bapat Protection : विद्यानंद बापट यांच्या आई-वडिलांनाही २४ तास पोलीस संरक्षण

Wisdom Teeth: बुद्धीशी अक्लकदाढचा संबंध काय, प्रत्येकाला का येत नाही अक्कलदाढ? जाणून घ्या भन्नाट कारण

Skin Care: चेहऱ्याच्या फ्रेशनेस आणि ग्लोसाठी रोज रात्री वापरा हा घरी तयार केलेला स्प्रे, स्किन प्रोब्लेम होतील दूर

SCROLL FOR NEXT