BANK HOLIDAYS NEXT WEEK saam tv
बिझनेस

बँकेची कामं लवकर उरका! पुढील आठवड्यात 3 दिवस बँका राहणार बंद! कारण काय?

Banks Closed For Three Days Next Week In November 2026: नोव्हेंबर २०२६ मध्ये पुढील आठवड्यात तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. १६, २० आणि २२ नोव्हेंबर रोजी SBI, HDFC, ICICI सह बँकांना सुट्टी असणार आहे.

Omkar Sonawane

पुढील आठवड्यात बँकेशी संबंधित काही महत्वाचे काम करण्याचे नियोजन करत असाल, तर आधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी नक्की तपासा. 16 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बँका तीन दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये SBI, HDFC, ICICI बँक, AXIS बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांसारख्या सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. RBI च्या बँक हॉलिडे कॅलेंडरनुसार, पुढच्या आठवड्यात छठ पूजा, इगास बग्वाल आणि रविवारच्या सुट्टीमुळे बँकिंग सेवा बंद राहतील. मात्र या सुट्ट्यांच्या काळात ऑनलाइन बँकिंग आणि UPI यांसारख्या डिजिटल सेवा सुरू राहतील.

बँका कधी कधी बंद राहतील?

पुढच्या आठवड्यात बँकांचे कामकाज तीन दिवस बंद राहणार आहे. मात्र या सुट्ट्या संपूर्ण देशात नसून वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू असतील.

16 नोव्हेंबर (सोमवार): बँकांची पहिली सुट्टी उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी असेल. या दिवशी छठ पूजेनिमित्त बिहारची राजधानी रांची येथे बँका बंद राहतील. या दोन्ही शहरातील SBI, HDFC, ICICI सह इतर सर्व बँकांचे कामकाज बंद राहील.

20 नोव्हेंबर (शुक्रवार): या दिवशी इगास बग्वाल हा सण आहे, जो उत्तराखंडची राजधानी डेहराडूनसह संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. हा उत्तराखंडचा पारंपारिक लोक उत्सव असल्याने या दिवशी फक्त उत्तराखंडमधील बँका बंद राहतील. देशातील इतर राज्ये आणि शहरांतील बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

22 नोव्हेंबर (रविवार): या दिवशी रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील. ही बँकांची नियमित साप्ताहिक सुट्टी आहे.

डिजिटल सेवांवर परिणाम होणार नाही

बँकांच्या शाखा बंद असल्या तरी डिजिटल बँकिंगची सुविधा ग्राहकांसाठी उपलबद्ध राहील. ज्याद्वारे महत्वाची आर्थिक कामे करता येतील. Google Pay, Phone Pay, Paytm आणि इतर सर्व UPI अप्सद्वारे पैशांची देवाणघेवाण सुरू राहील. यासोबतच मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग ATM यांसारख्या सुविधा देखील सुरू राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

NDAची ताकद वाढणार! भाजपचा जुना मित्रपक्ष पुन्हा करणार युती; राजकीय घडामोडींना वेग

Winter Diet : हिवाळ्यात वारंवार भूक का लागते? जेवणानंतरही काहीतरी खाण्याची इच्छा होतेय? जाणून घ्या कारणं

Maharashtra News Live Update: दुष्काळात पुणे महापालिकेकडून मॅरेथॉनसाठी ५० लाखांची देणगी

EPFO Pension Hike : पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर! 1 हजारांची पेन्शन थेट 3 हजार होणार? मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT