Bank Holiday In January 2024 Saam Tv
बिझनेस

Bank Holiday In January 2024 : जानेवारी महिन्यात १६ दिवस बँका राहाणार बंद, एका क्लिकवर पाहा सुट्टयांची यादी

Bank Holidays 2024 : १६ दिवसांच्या बँक सुट्टयांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असणार आहे. सुट्टया म्हटलं की, बाहेर जाण्याचे प्लान अनेकांचे सुरु होतात. अशातच जानेवारी महिन्यात १६ दिवस बँका बंद राहाणार आहे.

कोमल दामुद्रे

Bank Holidays In January 2024 List :

नवीन वर्ष सुरु झाले की, अनेकांना सगळ्यात आधी कॅलेडरमध्ये पाहायचे असतात त्या सुट्ट्या. सुट्टया म्हटलं की, बाहेर जाण्याचे प्लान अनेकांचे सुरु होतात. अशातच जानेवारी महिन्यात १६ दिवस बँका बंद राहाणार आहे.

१६ दिवसांच्या बँक सुट्टयांमध्ये (holiday) सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असणार आहे. आजकाल सर्व डिजिटल झाल्यामुळे बँकाची कामेही ऑनलाईन होतात. परंतु काही कामांसाठी बँकेत जाणे आवश्यक असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी (List) जाहीर केली आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन आणि अनेक सरकारी सुट्टया असल्याने बँका बंद राहाणार आहेत. मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे काम पूर्ण करु शकता.

डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस राहिले असून जानेवारी महिन्यात बँकांच्या सुट्टयांची यादी जाहिर केली आहे.

  • १ जानेवारी- नववर्षाभिनंदन

  • ७ जानेवारी - रविवार

  • ११ जानेवारी - मिशनरी डे (मिझारोम)

  • १२ जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती (पश्चिम बंगाल)

  • १३ जानेवारी - दुसरा शनिवार

  • १४ जानेवारी - रविवार

  • १५ जानेवारी - पोंगल/ थिरुवल्लुवर (तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश)

  • १६ जानेवारी - तुसू पूजा (पश्चिम बंगाल आणि आसाम)

  • १७ जानेवारी - गुरु गोविंद सिंह जयंती

  • २१ जानेवारी - रविवार

  • २३ जानेवारी - नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

  • २५ जानेवारी - राज्य दिन (हिमाचल प्रदेश)

  • २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन

  • २७ जानेवारी - चौथा शनिवार

  • २८ जानेवारी - रविवार

  • ३१ जानेवारी - मी-दाम-मी-फी (आसाम)

बँकेत जर काही काम असेल तर या सुट्ट्या नक्की बघून जा. या सुट्ट्यांबरोबरच वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या सणानुसार त्यांना प्रादेशिक सुट्ट्या असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT