Bank Holidays Saam Tv
बिझनेस

Bank Holiday: गणेशोत्सवानिमित्त देशातील बँकांना सुट्ट्या; वाचा किती दिवस बँका राहणार बंद

Bank Holiday In August Last Week: ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बँका अनेक दिवस बंद असणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त सुट्टी असणार आहे.

Siddhi Hande

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या

वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या

सुट्ट्यांची यादी वाचा

देशभरात गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सवासाठी लाखो कोकणवासीय आपापल्या गावी जायला निघाले आहेत. गणपतीनिमित्त अनेक ठिकाणी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.गणेशोत्सवाच्या काळात बँकांनादेखील सुट्ट्या आहेत. त्यामुळे जर या काळात तुमचे बँकेत काही काम असेल तर आधीच सुट्ट्यांची यादी बघून जा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये २५ ते ३१ ऑगस्टमध्ये बँका अनेक दिवस बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण आहेत. याचसोबत वीकेंडची सुट्टी असणार आहे. बँकांना किती दिवस सुट्ट्या असणार आहेत ते जाणून घ्या.

किती दिवस बँका बंद? (Bank Holidays)

सोमवार (२५ ऑगस्ट)- गुवाहाटीमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत.त्रिभव तिथी ऑफ श्रीमंता संकरदेवानिमित्त बँका बंद असणार आहेत.

ऑगस्ट २७ (बुधवार)- २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्ट्या असणार आहेत. अहमदाबाद, बेलापूर, मुंबई आणि नागपूर, बंगळुरु, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पणजी, विजयवाडा या ठिकाणी सुट्टी असणार आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सुट्ट्या असणार आहेत.

ऑगस्ट २८-भुवनेश्वर (ओडिशा) आणि पणजीमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

ऑगस्ट ३१(रविवारी)- रविवारी सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.

याचसोबत शेअर मार्केटदेखील बंद असणार आहे. बीएसई आणि एनएसई २७ ऑगस्ट रोजी बंद असणार आहे. गणेश चतुर्थीनिमित्त शेअर मार्केटमध्ये सुट्ट्या असणार आहे. या दिवशी बँका बंद असणार आहेत. परंतु एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, एटीएम, यूपीआय या सुविधा सुरु असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Maharashtra Live News Update: ST प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

SCROLL FOR NEXT