Bank Holiday News: सणासुदीच्या दिवसांमध्ये खर्च वाढत चाललेला असतो. आता काहीच दिवसांत दिवाळी येईल. त्यामुळे आपल्याला कॅशची गरज भासते. त्यासाठी तुम्ही बँकेत जाण्यार असाल तर थांबा. ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, उद्या देशातल्या एका राज्यात बँकांना सुट्टी असेल. पण इतर राज्यांमध्ये बँकांचं कामकाज नेहमीसारखंच सुरू राहील. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्टीचं कारण आणि तुमच्या बँकांची स्थिती जाणून घ्या.
RBI च्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी सिक्कीममध्ये बँका बंद राहतील. या दिवशी सिक्कीममध्ये 'ल्हाबाब दुचेन' (Lhabab Duchen) हा बौद्ध धर्मीयांचा महत्त्वाचा सण साजरा केला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान गौतम बुद्ध स्वर्गातल्या तुषिता लोकातून पृथ्वीवर परतले, त्या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. बौद्ध धर्मीयांसाठी या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे सिक्कीममध्ये या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सरकारी आणि खासगी बँकांच्या शाखा बंद राहतील.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ३ नोव्हेंबर रोजी सिक्कीम वगळता देशातल्या इतर राज्यांमध्ये बँकांचं कामकाज नेहमीसारखं सुरू राहील. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बँक ग्राहकांना या सुट्टीचा कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना बँकेत जाऊन आर्थिक व्यवहार करता येतील.
तर या आठवड्यातल्या बँकांच्या सुट्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर ३ नोव्हेंबरला सिक्कीममध्ये प्रादेशिक सुट्टी आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर हा पहिला शनिवार असल्याने बँका सुरू राहतील. तर ८ नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे देशातल्या बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.