Bank Holiday Update google
बिझनेस

Bank Holiday : आज की उद्या? बकरी ईद निमित्त बँका कधी बंद राहणार? 'ही' तारीख वाचूनच घराबाहेर पडा

Bakrid Bank Holiday: आज ईद निमित्त बॅंकांना सुट्टी असणार की नाही? असा प्रश्न अनेक ग्राहकांच्या मनात आहे. पुढील माहितीत याची माहिती सविस्तरपणे जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

भारतात सणावारांना बॅंका बंद ठेवल्या जातात. आज २७ मे रोजी बकरी ईद निमित्त बॅंकाना सुट्टी असेल. हा सण इस्लाम धर्मातला महत्वाचा सण मानला जातो. काही ठिकाणी २८ मे रोजी बॅंकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सण विविध राज्यांमध्ये चंद्रदर्शनानुसार साजरा करतात.

RBIच्या कॅलेंडरप्रमाणे बॅंकांच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात. त्यामुळे ज्यांना बॅंकेचे व्यवहार करायचे आहेत. त्यांनी तिथल्या स्थानिक शाखेत जाऊन चौकशी करावी.

२७ मे रोजी महाराष्ट्रात बॅंका सुरु

पुढील माहितीत आपण २७ मे रोजी कोणत्या शहरांमध्ये बॅंका सुरु असणार याची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये अगरतळा, अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, गुवाहाटी. इम्फाळ, जम्मू, कानपूर, कोची, कोलकत्ता, लखनऊ, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि अनेक शहरांमध्ये बॅंकांना सुट्टी देण्यात आली आहे. पण महाराष्ट्रातल्या सर्व बॅंक शाखांमध्ये रोजचे कामकाज सुरु असणार आहे.

महाराष्ट्रात २८ मे रोजी कोणत्या शाखा बंद राहणार?

महाराष्ट्रात ईदी निमित्त २८ मे रोजी सर्व सार्वजनिक आणि खासगी बॅंकांच्या शाखांना सुट्टी असेल. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, छ. संभाजी नगर अशा अनेक राज्यातील आणि सर्व शहरातील बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमचे महत्वाचे रोख व्यवहार, चेक जमा किंवा इतर कामे तुम्हाला या २ दिवसांमध्ये करता येणार नाहीत.

ऑनलाइन बॅंकिंग सेवा सुरु राहणार का?

बॅंका बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल सेवांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. युपीआय, मोबाइल बॅंकींग, नेटबॅंकिंग, IMPS, NEFT आणि RTGS सेवा नियमितपणे सुरु राहणार आहेत. तसेच ATM मधून रोख रक्कम काढणं आणि बाकीचे व्यवहारसुद्धा सुरु राहतील. त्यामुळे तुम्ही महत्वाचे व्यवहार या दिवसांमध्ये पूर्ण करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT