SBI EMPLOYEES STRIKE MAY 2026: BANKS MAY REMAIN CLOSED FOR 4 DAYS Saam Tv
बिझनेस

Bank Closed : SBI कर्मचाऱ्यांचा संप! सलग ४ दिवस बँका बंद राहणार

SBI Bank Strike News Update : SBI कर्मचाऱ्यांनी २५ आणि २६ मे २०२६ रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. शनिवार-रविवार सुट्टीमुळे सलग चार दिवस बँकिंग सेवा ठप्प राहण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • SBI कर्मचाऱ्यांचा २५-२६ मे रोजी देशव्यापी संप

  • सलग चार दिवस बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता

  • १६ प्रलंबित मागण्यांवरून आंदोलन तीव्र

  • डिजिटल बँकिंग सेवा मात्र सुरू राहणार

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या State Bank of India (SBI) मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. All India State Bank of India Staff Federation (AISBISF) या संघटनेने २५ आणि २६ मे २०२६ रोजी हा संप होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस जोडून आल्याने या संपामुळे ४ दिवस बँक बंद राहणार आहेत. या संपात देशभरातील SBI कर्मचारी सहभागी होणार असून बँकिंग सेवांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

संघटनेने २ मे २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात बँक व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून त्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे. अनेक प्रलंबित मागण्या वर्षानुवर्षे रखडलेल्या असून, त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

फेडरेशनने SBIच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात Industrial Disputes Act, १९४७ अंतर्गत संपाची नोटीस दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या एकूण १६ मागण्यांमध्ये नोकरीची सुरक्षा, पेन्शन, पदोन्नती, तसेच कामकाजाशी संबंधित सुविधा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून ‘मेसेंजर’ पदाची भरती बंद असल्याचा मुद्दा संघटनेने उचलला आहे. त्यामुळे हे पद हळूहळू संपुष्टात येत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी रोजगाराच्या संधी कमी होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकांची कमतरता असल्याचेही फेडरेशनने अधोरेखित केले आहे. सूरत येथील SBI शाखेत झालेल्या दरोड्याचा दाखला देत, सुरक्षेतील त्रुटी गंभीर ठरू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, २३ मे हा चौथा शनिवार आणि २४ मे हा रविवार असल्यामुळे बँका आधीच बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत २५ आणि २६ मे रोजी संप झाल्यास सलग चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे. मात्र, ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे डिजिटल सेवा आणि ऑनलाइन व्यवहार सुरळीत सुरू राहतील. फक्त शाखांशी संबंधित कामे, जसे की चेक जमा करणे, रोख व्यवहार आदी सेवा काही काळासाठी बंद राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! मुंबईतील समुद्रात चार महिन्यात २४ वेळा भरती; उसळणार साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा, हवामान विभागाचा अलर्ट

भवानीच्या दर्शनासाठी भाविकांची लूट; बोगस पुजारी आणि एजंटांचा भाविकांना गंडा

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला

कर्नाटकमध्ये मोठी राजकीय फेरबदल; काँग्रेसनं बदलला प्रदेशाध्यक्ष

Maharashtra News Live Update: - शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरेदी केंद्र नसलेल्या तालुक्यात नाफेड थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करणार

SCROLL FOR NEXT