Bank Holidays September 2026 meta ai
बिझनेस

Bank Closed : मोठी बातमी! लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

Bank Strike 2026: 11 सप्टेंबरला UFBU च्या देशव्यापी संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांचे बँकिंग, PLI आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही बँकांते व्यवहार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त संस्था युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांनी ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, ग्राहकांना सलग चार दिवस बँकिंग सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

UFBU च्या मते, आठवड्यात पाच दिवस बँका सुरू ठेवण्याचा निर्णय रखडणं, परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) संदर्भातील मतभेद आणि पेन्शनशी संबंधित मागण्या ही संपाची महत्त्वाची कारणं आहेत.

११ सप्टेंबरला शुक्रवार असल्यामुळे त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे. त्यातच १४ सप्टेंबरला काही राज्यांमध्ये गणेश चतुर्थीची सुट्टी असल्यामुळे काही भागांत बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, सुट्ट्यांमुळे होणारा परिणाम राज्यनिहाय वेगळा असू शकतो.

पुढे तीन दिवसांचा संप

UFBU ने सरकार आणि बँक व्यवस्थापनाने मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर २८ सप्टेंबरपासून तीन दिवसांचा सलग संप करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे ही वेळ सहामाही लेखा-जोख्य्याच्या दिवसांशी संबंधित असल्याने बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरपासून अनिश्चितकालीन संप करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.

पाच दिवसांच्या बँकिंगचा निर्णय अजूनही रखडलेला

UFBUच्या म्हणण्यांनुसार, भारतीय बँक संघाने (IBA) मार्च २०२४ मध्ये झालेल्या १२ व्या द्विवार्षिक करारांतर्गत आठवड्यात पाच दिवस बँकिंग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सोमवार ते शुक्रवार कामकाज ठेवून दररोज कामाचे तास ४० मिनिटांनी वाढवण्याचा प्रस्ताव होता. मात्र सरकारची अंतिम मंजुरी अजून रखडलेली असल्याचा संघटनांचा दावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CSMT पुनर्विकासासाठी १२८ झाडांवर कुऱ्हाड

Night Leg Pain : फक्त रात्रीच पाय का दुखतात? दुर्लक्ष करू नका, 'ही' असू शकतात ३ गंभीर कारणं

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

Good News: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुष्काळात फडणवीस सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय

Young Cricketer Death: टीम इंडियाच्या खेळाडूने संपवलं आयुष्य; क्रिकेट विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT