Audi Q7 Bold Edition Saam Tv
बिझनेस

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Audi Q7 Bold Edition: ऑडी इंडियाने भारतात आपल्या Q7 कारचा बोल्ड एडिशन लॉन्च केला आहे. ही एक सुपर लक्झरी 7 सीटर एसयूव्ही आहे. जी पॉवरफुल इंजिन आणि अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज आहे.

Satish Kengar

ऑडी इंडियाने भारतात आपल्या Q7 कारचा बोल्ड एडिशन लॉन्च केला आहे. ही एक सुपर लक्झरी 7 सीटर एसयूव्ही आहे. जी पॉवरफुल इंजिन आणि अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज आहे. नवीन बोल्ड एडिशन एक्सटीरियर ब्लॅक स्टाइलिंग पॅकेजसह लॉन्च करण्यात आली आहे.

याच्या समोर आणि मागील बाजूस ब्लॅक ऑडी रिंग देखील उपलब्ध आहेत. या मॉडेलचे फक्त मर्यादित युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. दिल्लीत नवीन बोल्ड एडिशनची किंमत 97.84 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Audi Q7 मध्ये 3.0L V6 TFSI इंजिन आहे. जे 48V माइल्ड हायब्रिडने सुसज्ज आहे. हे इंजिन 340 hp आणि 500 ​​Nm टॉर्क जनरेट करते. यात ऑल व्हील ड्राइव्हची सुविधा आहे. ही कार 0-100 किमी/ताशी वेग पकडण्यासाठी फक्त 5.6 सेकंद घेते. याचा टॉप स्पीड 250kmph आहे. यात 19 इंचाची व्हील्स देण्यात आले आहेत.

नवीन बोल्ड एडिशनमध्ये 19 स्पीकरसह 730 वॅट्सची साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. सेफ्टीसाठी यात ब्रेक असिस्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमचा सरफेस ईबीडी आणि 8 एअरबॅग्जची सुविधा आहे. यात 360 डिग्री कॅमेरा सेटअप आहे. ज्याच्या मदतीने ही कार सहज पार्क करता येईल.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात पॅनोरामिक सनरूफ, इंटेलिजेंट वायपर्स, कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, ड्युअल टोन व्हील्स, 7 ड्राइव्ह मोड्स, डायनॅमिक लाइट्स आणि पार्क असिस्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

SCROLL FOR NEXT