Atal Pension Yojana Update google
बिझनेस

APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! २ कप चहाचे पैसे वाचवा अन् ₹५००० पेन्शन मिळवा

Atal Pension Yojana Update: तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन सहज मिळवू शकता. अटल पेन्शन योजनेत तुम्हाला भविष्यासाठी सुरक्षितपणे गुंतवणूक करता येते.

Sakshi Sunil Jadhav

सध्याची वाढती महागाई पाहता भविष्यासाठी आत्तापासूनच काही पैसे जमवायला सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला गुंतवणूक हा मार्ग जास्त फायद्याचा ठरु शकतो. तुम्ही यात २ वेळेच्या चहाचे पैसे दिवसाला वाचवून गुंतवणूक करु शकता. त्याने तुम्हाला भविष्यात दरमहा ५००० रुपयांची पेन्शन मिळू शकते. जी आयुष्यभरासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. यात कसे आणि किती पैसे गुंतवायचे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

केंद्र सरकारने नागरिकांच्या भविष्यातील पेन्शनचा विचार करुन एक जबरदस्त योजना सुरु केली आहे. त्या योजनेत तुम्हाला १०००, २०००, ३०००, ४०००, ५००० पर्यंत दरमहा पेन्शन मिळू शकते. तसेच भविष्यात हा आकडा १०,००० रुपयांपर्यंत जावू शकतो. अशा चर्चाही आहेत.

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही भविष्यात चांगला परतावा मिळवून देणारी पेन्शन योजना आहे. ही तुम्हाला म्हातारपणात आधार देणारी जबरदस्त योजना आहे. कारण यात तुम्हाला कमी पैशात गुंतवणूक करता येते. तसेच याने भविष्यात तुम्हाला चांगल्या पैशांची पेन्शन मिळते. याची शाश्वती केंद्र सरकार घेते. यात तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षापासून ४० वयापर्यंत गुंतवणूक करू शकता. याचा लाभ तुम्हाला वयाच्या ६० वर्षांनंतर मिळतो. तुम्हाला मग याची दरमहा पेन्शन मिळते.

तुम्हाला दर महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन हवी असेल तर, महिन्याला तुम्हाला ५७७ रुपये गुंतवणूक करावी लागेल. या योजनेअंतर्गत, जर तुम्ही वयाच्या ३० साव्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केलीत, तर तुम्हाला दरमहा ५७७ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला दिवसाला १९ किंवा २० रुपये बचत करावी लागेल. एका चहाच्या कपाची किंमत जवळपास १० रुपये असते. त्यामुळे रोज दोन कप चहा पिणं टाळून, तुम्ही दररोज २० रुपयांची बचत करु शकता. याने तुमचे महिन्याला ५७७ सहज जमा होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT