Atal Pension Yojana meta ai
बिझनेस

Atal Pension Yojana : बँकेत खाते असेल तर ही बातमी वाचाच! दरमहा मिळणार ५ हजार रुपये

Government Pension Scheme: अटल पेन्शन योजनेत वयाच्या ३० व्या वर्षी दरमहा ५७७ रुपये भरून वयाच्या ६० वर्षांनंतर ५००० रुपये मासिक पेन्शन मिळवता येते.

Sakshi Sunil Jadhav

म्हातारपणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि नियमित उत्पन्न मिळत राहावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण रिटायरमेंटनंतर नोकरीतून मिळणारा पगार बंद होतो. अशा वेळी घरखर्च, औषधोपचार आणि इतर गरजा भागवण्यासाठी पैशांचं टेन्शन वाढतं. हेट टेन्शन दूर करण्यासाठी केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना (APY) फायदेशीर ठरू शकते. महत्त्वाचं म्हणजे, या योजनेत महिन्याला फक्त ५७७ रुपयांचं योगदान देऊन वयाच्या ५००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळवता येते.

अटल पेन्शन योजना नेमकी काय आहे?

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसह नागरिकांना म्हातारपणात नियमित उत्पन्नाचा आधार देणं हा आहे. या योजनेत सहभागी झालेल्या व्यक्तीला वयाच्या ६० वर्षानंतर निवडलेल्या पर्यायानुसार दरमहा १०००, २०००, ३०००, ४०००, ५००० रुपये मिळतील.

वयाच्या ३० व्या वर्षी किती पैसे भरावे लागतील?

समजा, तुमचं वय सध्या ३० वर्षे आहे आणि तुम्हाला रिटायरमेंटनंतर दर महिन्याला ५,००० रुपये पेन्शन हवी आहे. तर यासाठी तुम्हाला वयाच्या ६० वर्षांपर्यंत नियमित योगदान द्यावं लागेल.

  • मासिक हप्ता: ५७७ रुपये

  • त्रैमासिक हप्ता: १,७२० रुपये

  • सहामाही हप्ता: ३,४०५ रुपये

म्हणजेच, दर महिन्याला ५७७ रुपये भरल्याने ३० वर्षांत एकूण २ लाख ७ हजार ७२० रुपये योगदान जमा होईल. त्यानंतर वयाच्या ६० वर्षांपासून दरमहा ५,००० रुपये पेन्शन मिळेल.

योजनेत कोणाला मिळतो लाभ?

अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. तसेच, १ ऑक्टोबर २०२२ पासून आयकर भरणाऱ्या व्यक्तींना नवीन APY खातं उघडता येत नाही. पात्र व्यक्ती बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील बचत खात्याच्या माध्यमातून या योजनेत सहभागी होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips : कमी उंचीची चिंता सोडा! हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी वापरा या 5 फॅशन ट्रिक्स

Maharashtra News Live Update: शिवाजीनगर न्यायालयासमोरील हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन

Accident : एसटीच्या चाकाखाली चिरडून एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल, 10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पोलिस दलात खळबळ

Grocery Price Hike : कांदा-साखर महागली, डाळी-तांदळाचे भावही वाढले; किराणा बाजारातील नवे दर वाचाच

SCROLL FOR NEXT