Atal Pension Scheme Saam Tv
बिझनेस

Atal Pension Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५००० रुपयांची पेन्शन मिळवा; सरकारची अटल पेन्शन योजना नक्की आहे तरी काय?

Atal Pension Scheme: भारत सरकारने नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना राबवली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत नागरिकांना फक्त दर दिवसाला ७ रुपयांची गुंतवणूक करायची आहे.

Siddhi Hande

प्रत्येकालाच आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे, असं वाटतं असते. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला एक ठरावीक रक्कम पेन्शन स्वरुपात मिळते. अशीच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजनेत तुम्हाला रोज ७ रुपये गुंतवायचे आहेत. रोज ७ रुपये गुंतवून तुम्ही भविष्यात ६०,००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. सरकारची ही योजना तुमच्या भविष्यासाठी उत्तम आहे.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना जास्त फायदेशीर आहे. जर तुम्ही ३२ वर्षांचे आहात, तर तुम्हाला या योजनेत दर महिन्याला ६८९ रुपये जमा करायचे असतात. त्यामुळे तुम्ही ६० वर्षानंतर ५००० रुपयांची पेन्शन मिळते. दरम्यान, जर तुम्ही फक्त १८ वर्षांचे असाल तर तुम्हाला दर महिन्याला २१० रुपये जमा करायचे आहेत.

अटल पेन्शन योजना २०१५-१६ च्या बजेटमध्ये लाँच केली होती. असंगठित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भविष्यात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेला पेन्शन फंड रेगुलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटीद्वारे चालवली जाते. या योजनेत दर महिन्याला १,००० ते ५,००० रुपयांची पेन्शन मिळते. अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही जेवढ्या लहान वयात गुंतवणूक कराल, तेवढेच तुम्हाला जास्त योगदान मिळेल. जर तुम्ही १८ वर्षांचे आहात तर तुम्हाला महिन्याला २१० रुपये गुंतवावे लागतील. तेव्हा तुम्हाला ५००० रुपयांची पेन्शन मिळेल. जर तुम्ही ४० वर्षांचे आहात तर तुम्हाला दर महिन्याला १४५४ रुपये गुंतवावे लागतील तेव्हा तुम्हाला ६० वर्षानंतर दर महिन्याला ५००० रुपये मिळतात.

या योजनेत सरकारदेखील योगदान देते. सरकार दरवर्षी जास्त १००० रुपयांपेक्षा जास्त योगदान दिलेल्या रक्कमेपेक्षा ५० टक्के रक्कम देतात. जे लोक टॅक्स भरत नाही त्यांच्याच खात्यात सरकार पैसे जमा करते. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळणार आहे. त्यामुळे तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT