बिझनेस

LPG Connection Update : ...तर ८ दिवसांत तुमचं LPG गॅस कनेक्शन होणार बंद; Indane, HP आणि Bharat गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

LPG Closure Fact Check : 30 जून २०२६ नंतर एलपीजी कनेक्शन बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. पण सरकारने याबाबत कोणता निर्णय घेतलाय हे पुढील माहितीतून जाणून घेऊयात.

Sakshi Sunil Jadhav

तुमच्याकडे एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये ३० जून २०२६ नंतर इंडेन, भारत गॅस आणि HP गॅसचे एलपीजी कनेक्शन बंद केलं जाणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सर्वच ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. पण केंद्र सरकारने अजून या प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती किंवा मुदर जाहीर केलेली नाही.

मार्च 2026 मध्ये केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार ज्या भागांमध्ये PNG म्हणजेच पाइपाने घरपोच गॅस पुरवठ्याची सुविधा आहे, त्या भागातल्या ग्राहकांना हळूहळू पीएनजीचा वापर करा असं सांगण्यात येत आहे. याचसोबत "नो ड्युअल कनेक्शन पॉलिसी" सुद्धा लागू करण्यात आली आहे. याचा अर्थ, समजा एखाद्या घरात पीएनजी कनेक्शन असेल नवीन एलपीजी कनेक्शन मिळणार नाही. मात्र काही ठिकाणी एलपीजी कनेक्शन सरेंडर करण्याची गरज लागू शकते.

सरकारने पीएनजी गॅस स्वीकारण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी दिला होता. याचा शेवट हा जून महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३० जून रोजी असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.पण पेट्रोलियम मंत्रालयाने ३० जूननंतर सर्व एलपीजी कनेक्शन आपोआप बंद केले जातील, अशी माहिती कुठेही स्पष्टपणे सांगितलेली नाही. त्यामुळे देशभरातल्या एलपीजी ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, मार्च २०२६ पासून आत्तापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त पीएनजी कनेक्शन सुरू किंवा सक्रिय करण्यात आले आहेत. तसेच मोठ्या संख्येने ग्राहकांनी पीएनजीसाठी नोंदणी केली असून काही कुटुंबांनी एलपीजीऐवजी पीएनजीचा पर्याय निवडला आहे.

सरकारच्या मते, पीएनजी जास्त सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर आहे. सिलेंडर बुकिंगची गरज नसल्यामुळे ग्राहकांना सतत गॅस पुरवठा मिळतो. त्यामुळे सरकार पीएनजी वापर वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन करत आहे. सध्या इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसचे एलपीजी सिलेंडर पुरवठे नियमितपणे सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवणं टाळा आणि अधिकृत माहितीची वाट पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

Sleeping Problems: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपता? शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Chanakya Niti : ऑफिसमध्ये जळणारे सहकारीही करतील कौतुक! चाणक्यांच्या या ७ नीती ठरतील यशाची गुरुकिल्ली

नेपाळमध्ये पुन्हा तरुणांच्या आंदोलनाचा भडका! शाहांच्या राजीनाम्याची मागणी

Bath Routine: जापानी लोक सकाळी नाही तर रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करतात, जाणून घ्या यामागच्या ५ खास गोष्टी

SCROLL FOR NEXT