अनिल अंबानीच्या यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्स भरारी घेत अंबानी यांचं सारं कर्ज फेडलंय. रिलायन्स पावरच्या शेअर्सनं गुरुवारी ५ टक्क्यांच्या तेजीसह ४५.६४ रुपयांवर पोहोचलाय. दुसऱ्या दिवशी कंपनीचे शेअर्स अपर सर्किटवर आहेत. रिलायन्स पावरच्या शेअर्सनं बुधवारी ५ टक्क्यांच्या तेजीसह ४३.४७ रुपयांनी बंद झाला होता.
अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरने घोषणा केली आहे की, त्यांच्या उपकंपनी रोजा पॉवर सप्लायने सिंगापूरस्थित वर्दे पार्टनर्सला 485 कोटी रुपयांचे संपूर्ण थकित कर्ज परत केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तिने एकूण 1318 कोटी रुपयांचे प्री-पेमेंट केले आहे आणि रोजा पॉवर सप्लाय ही शून्य-कर्ज असलेली संस्था बनली आहे.
शेअर्सने उच्चांकी गाठल्यानंतर कंपनीने सर्व कर्ज मिटवलंय. यानंतर कंपनी त्याची घोषणा देखील केलीय. कंपनीच्या उपकंपनी रोजा पॉवर सप्लायने सिंगापूरस्थित वर्दे पार्टनर्सला ४८५ कोटी रुपयांचे संपूर्ण थकित कर्ज परत केलेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तिने एकूण १३१८ कोटी रुपयांचे प्री-पेमेंट केले आहे. रोजा पॉवर सप्लाय ही शून्य-कर्ज असलेली कंपनी बनलीय. रोजा पॉवर उत्तर प्रदेशमध्ये १२०० मेगावॅटचा कोल बेस्ट थर्मल पॉवर प्लांट ऑपरेट करते. कंपनीने वर्ष २०२२ मध्ये वर्डे पार्टनर्सकडून १००० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मागील ४ वर्षात १३७३ टक्क्यांनी उच्चांकी केली होती. कंपनीचा शेअर्स ६ नोव्हेंबर २०२० ला ३.१० रुपयावर होता. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सने ७ नोव्हेंबर २०२४ ला ४५.६४ रुपयांवर पोहोचला होता. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १२१ टक्क्यांची तेजी आली होती. कंपनीचे शेअर्स ७ नोव्हेंबर २०२३ ला २०.२७ रुपयांवर होते तर ७ नोव्हेंबर २०२४ ला हे शेअर्स ४५ रुपयांवर होते. यावर्षी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ९० टक्क्यांनी वाढ झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.