American Visa News Saam Digital
बिझनेस

American Visa News: निवडणुकांच्या तोंडावर अमेरिकेकडून व्हिसा शुल्कात वाढ , भारतीयांना बसणार फटका

American Visa News Update: अमेरिकेमध्ये यावर्षी अध्यक्षिय निवडणुका होत असून निवडणुकीआधीच व्हिसा सेवांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. H-1B, L-1 आणि EB-5 सारख्या विविध श्रेणीतील व्हिसासाठी प्रचंड शुल्क वाढीची घोषणा केली आहे.

Sandeep Gawade

American Visa News

अमेरिकेमध्ये यावर्षी अध्यक्षिय निवडणुका होत असून निवडणुकीआधीच व्हिसा सेवांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. H-1B, L-1 आणि EB-5 सारख्या विविध श्रेणीतील व्हिसासाठी प्रचंड शुल्क वाढीची घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून शुल्कवाढ लागू करण्यात येणार असून नॉन-इमिग्रंटमधील शुल्कवाढीमुळे भारतीयांना मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेत स्थलांतरीत होण्यासाठी भारतीय नागरिक या श्रेणीतील व्हिसाचा वापर करतात.

बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, H-1B व्हिसा अर्जाचे शुल्क आता 460 डॉलर ऐवजी 780 डॉलर भरावे लागणार आहे. तर H-1B नोंदणी शुल्क 10 डॉलरवरून 215 डॉलरपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच L-1 व्हिसा शुल्क 460 डॉलरवरून 1,385 डॉलर पर्यंत वाढवण्यात आले आहे. तर EB-5 चे शुल्क डॉलरवरून 3,675 वरून 11,160 डॉलर पर्यंत वाढवण्यात आलं आहे. 2016 नंतर प्रथमच शुल्कवाढ करण्यात आली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी भारत मध्य पूर्व-युरोप व्यापार कॉरिडॉर (IMEC) चा उल्लेख केला आणि हा कॉरिडॉर येत्या 100 वर्षांत जागतिक व्यापाराच केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

कोविड महामारीनंतर एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येत आहे. जग अतिशय कठीण काळातून जात असताना भारताने G20 चे आयोजन केले होते. साथीच्या रोगामुळे अन्न संकट, खतांचा तुटवडा, अन्न आणि वित्तपुरवठा अशा परिस्थितीत भारताने यशस्वीरित्या मार्ग काढला काढल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT