Tariff Saam Tv
बिझनेस

Tariff: वस्त्रोद्योग, हिरे, दागिने अन् बरंच काही; टॅरिफचा भारताला बसणार फटका; या क्षेत्रांवर होणार परिणाम

America Tariff Effect on India: अमेरिकेने काल भारतावर २५ टक्के टॅरिफ कर लादला आहे. याचा भारताला मोठा फटका बसणार आहे. भारताच्या अनेक उद्योगांवर याचा वाईट परिणाम होणार आहे.

Siddhi Hande

  • अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ कर लादला आहे

  • भारताच्या अनेक उद्योगांवर परिणाम

  • हिरे, टेक्स्टाईल, ऑटो मोबाईल इंडस्ट्रीवर होणार परिणाम

अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने काल भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. हा टॅरिफ कर १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी अनेक वर्षांपासून भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध, मात्र व्यापार कमी,भारत जगात सर्वाधिक आयात शुल्क लादणारा देश अशी कारणे देत टॅरिफ कर लादला आहे. या नवीन आयात कर लागू झाल्यावर अनेक व्यावसायिंक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला आहे. यामुळे भारतावर काय परिणाम होणार हे जाणून घ्या.

कापड आणि वस्त्र उद्योगांवर परिणाम (Effect on Textile Industry)

भारताची टेक्स्टाईल इंडस्ट्री मोठी आहे. भारत हा कापड आणि वस्त्रोद्योगात सर्वात जास्त निर्यात करते. अमेरिक अनेक कपडे आणि पादत्राणे भारताकडून खरेदी करते. टॅरिफ लागू झाल्यावर अमेरिकन बाजारपेठेत या वस्तू महाग होतील. त्यामुळे परिणामी भारतीय कंपन्यांच्या ऑर्डर आणि शिपमेंटवर परिणाम होईल आणि निर्यात कमी होईल.

दागिने आणि हिरे (Diamod Industry)

भारत हा जगातील सर्वात जास्त हिरा निर्यात करणारा देश आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात दागिने आणि हिऱ्याची निर्यात होते. टॅरिफ कर लादल्यानंतर दागिने आणि हिरे महाग होतील.

ऑटोमोबाईल क्षेत्रावर परिणाम (Automobile)

भारत अमेरिकेला ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्ट्सची निर्यात करते. त्यामुळे १ ऑगस्टपासून या पार्ट्सच्या किंमती वाढू शकतात आणि मागणी कमी होऊ शकते.

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला फटका

भारत दरवर्षी १४ अब्ज डॉलर्सच्या किंमतीचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची निर्यात करते. अमेरिकेच्या टॅरिफ करामुळे हे दर वाढतील. यामध्ये भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची निर्यात कमी होऊ शकते.

या क्षेत्रावर होणार परिणाम (America Tarrif Effect On These Industry)

अमेरिकेने टॅरिफ कर लादला आहे. यामध्ये औषधे, ऊर्जा उत्पादने त्यात तेल, वायू, कोळसा आणि तांबे यांचा समावेश आहे. त्यामुळे याच्या निर्यातीवर परिणाम होतो. परिणामी मागणी कमी होईल आणि भारताला फटका बसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याची मोठी ऑफर; काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी भाजपसोबत येण्याचे आमंत्रण

Blood Pressure: BP च्या गोळ्यांमुळे किडनी खराब होते का? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली खरी माहिती

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये अखेर उलगडणार सर्वात मोठं रहस्य; सायलीच आहे खरी तन्वी, मधुभाऊंनी दिला इशारा!

Maharashtra News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी तालुका कृषी कार्यालयात गोंधळ

Chapati Recipe : पावसाळ्यात चपाती थंड झाल्यावर कडक होते? फॉलो करा 'ही' रेसिपी, मिळतील मऊ-लुसलुशीत पोळ्या

SCROLL FOR NEXT