Airtel Recharge Plan Hike News Saam Tv
बिझनेस

Airtel ने दिला ग्राहकांना झटका, प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत केली मोठी वाढ; 38 कोटी लोकांना बसणार फटका

Airtel Recharge Plan Hike News: Airtel ने आपल्या 38 कोटींहून अधिक ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. यातच कंपनीने कोणत्या प्लॅनमध्ये किती रुपयांनी वाढ केली आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

साम टिव्ही ब्युरो

रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एअरटेलने शुक्रवारी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. एअरटेलचे रिचार्ज प्लॅन 600 रुपयांनी महागले आहेत. वाढलेल्या किमती 3 जुलैपासून लागू होतील.

एअरटेल 38 कोटींहून अधिक ग्राहकांसह देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. स्पेक्ट्रम खरेदी करताना येणारा अतिरिक्त बोजा कंपनी आपल्या ग्राहकांकडून वसूल करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. कंपनीने कोणत्या प्लॅनच्या किमतीत किती रुपयांनी वाढ केली आहे, हे जाणून घेऊ...

अनलिमिटेड व्हॉईस प्लॅन (Airtel Unlimited Data Voice Plan)

28 दिवस वैधतेसह येणाऱ्या 179 रुपयांचा प्लॅन आता 20 रुपयांनी महाग झाला आहे. आता यासाठी 199 रुपये मोजावे लागतील. यात 2GGB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस ग्राहकांना मिळतं.

84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या 455 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता 54 रुपयांनी महाग झाली आहे. याची किंमत आता 509 रुपये झाली आहे. यात 6GGB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस ग्राहकांना मिळतं.

365 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या 1799 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता थेट 200 रुपयांनी वाढली आहे. याची किंमत आता 1,999 रुपये झाली आहे. यात 24GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस ग्राहकांना मिळतं.

डेली डेटा प्लॅन (Airtel Prepaid Daily Data Plans)

265 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता 34 रुपयांनी महाग झाला आहे. याची नवीन किंमत 299 रुपये आहे. यामध्ये, दररोज 1GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहेत.

299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता 50 रुपयांनी महाग झाला आहे. याची नवीन किंमत 349 रुपये आहे. यात ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळणार.

359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता 50 रुपयांनी महाग झाला आहे. याची नवीन किंमत 409 रुपये आहे. यात ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळणार.

399 रुपयांचा प्रीपेड प्लॅनही 50 रुपयांनी महाग झाला आहे. याची नवीन किंमत 449 रुपये आहे. यामध्ये दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहेत.

479 रुपयांचा प्रीपेड प्लॅनही 100 रुपयांनी महाग झाला आहे. याची नवीन किंमत 579 रुपये आहे. यात ग्राहकांना 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळणार.

549 रुपयांचा प्रीपेड प्लॅनही 100 रुपयांनी महाग झाला आहे. याची नवीन किंमत 649 रुपये आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस 56 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहेत.

719 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 140 रुपयांनी महाग झाला आहे. याची नवीन किंमत 859 रुपये आहे. यात ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळणार. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT