Air India Wi-Fi Services: Saam Tv
बिझनेस

Air India नं दिलं नव्या वर्षाचं गिफ्ट; उंच आकाशात वापरता येणार Wi-Fi, आता सोशल मीडियावर पोस्ट करा 'सुपर मूड' Pics

Air India Wi-Fi Services: एअर इंडियाच्या न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि सिंगापूर या आंतरराष्ट्रीय मार्गांवर मोफत वाय-फाय आधीच दिले जात आहे. आता ही सेवा देशांतर्गत मार्गावर सुरू करण्यात येणार आहे.

Bharat Jadhav

नवीन वर्षाच्या निमित्ताने एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना एक मोठं गिफ्ट दिलंय. देशांतर्गत उड्डाणांवर मोफत वाय-फाय इंटरनेट सुरू करणारी एअर इंडिया ही पहिली भारतीय विमान कंपनी ठरलीय. एअर इंडियाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, एअरबस A350, बोईंग 787-9 आणि Airbus A321neo विमानातील प्रवासी इंटरनेट ब्राउझ करू शकतील.

सोशल मीडिया पाहू शकतील. 10,000 फुटांवर उड्डाण करताना काम करू शकतील किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला संदेश देऊ शकतील.

देशांतर्गत उड्डाणांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा

एअर इंडियाच्या न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि सिंगापूर या आंतरराष्ट्रीय मार्गांवर ही सेवा आधीच दिली जातेय. आता देशार्गंत मार्गावर मोफत वाय-फाय दिलं जाणार आहे. एअर इंडिया वेळोवेळी आपल्या ताफ्यातील इतर विमानांवर ही सेवा सुरू करण्याचा विचार करतेय. आयओएस किंवा अँड्रॉइड ओएस असलेल्या लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोनवर वाय-फाय सेवा मोफत उपलब्ध असणार असल्याची माहिती एअरलाइनकडून सांगण्यात आले आहे.

एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोगरा म्हणाले, कनेक्टिव्हिटी हा आता आधुनिक प्रवासाचा अविभाज्य भाग बनलाय. आमचे प्रवासी वेबशी कनेक्ट होण्याच्या सुविधेची प्रशंसा करतील आणि एअर इंडियाच्या नवीन अनुभवाचा विमानात आनंद घेतील असा विश्वास डोगरा यांनी वर्तवलाय.

एअर इंडियामध्ये वाय-फाय कसे वापरणार?

तुमच्या डिव्हाइसवर वाय-फाय अॅक्टिव्ह करा आणि वाय-फाय सेटिंग्जवर जा.

एअर इंडिया वाय-फाय नेटवर्कवर क्लिक करा.

एकदा तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये एअर इंडिया पोर्टलवर पोहोचल्यानंतर, तुमचा PNR आणि आडनाव एंटर करा.

त्यानंतर नि: शुल्क वाय-फायचा आनंद घ्या.

दरम्यान एअर इंडियाचे प्रमुख कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, खासगीकरणानंतर कंपनीने बरीच प्रगती केलीय. येत्या काही वर्षांत त्याची जागतिक पोहोच आणखी वाढेल. देशांतर्गत आणि कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांना सेवा देणाऱ्या सिंगल-आइसल फ्लीटचे अंतर्गत नूतनीकरण चालू आहे आणि २०२५ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल.

तोट्यात चाललेली एअर इंडिया कंपनी टाटा समूहाने जानेवारी २०२२ मध्ये सरकारकडून विकत घेतली. दरम्यान एअर इंडिया सध्या महत्त्वकांक्षी पंटवार्षिक योजनेतून जात आहे. एअर इंडियाने २०२४मध्ये विस्तारा कंपनीचं आपल्या कंपनीत विलिनीकरण केलंय. तसेच एअर इंडिया एक्सप्रेस आणि AIX Connect देखील एकत्रित करण्यात आलेत. विल्सन यांनी आपल्या नवीन वर्षाच्या संदेशात म्हटले आहे की, या विलीनीकरणामुळे आणि नवीन विमानांच्या वितरणामुळे एअर इंडिया समूहाच्या ताफ्यात विमानांची संख्या ३०० झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT