Air India cabin crew BMI policy google
बिझनेस

Air India Update: वजन वाढलं तर थेट पगार कापणार..., Air India चा नवा नियम; वाचा सविस्तर

Employee Fitness Policy: एअर इंडियाने केबिन क्रूसाठी नवीन BMI आणि फिटनेस नियम लागू करण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या ड्युटी आणि पगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

लोक चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी नेहमीच शोधत असतात. पण चांगल्या नोकरीसाठी आता तुमचं आरोग्यही चांगलं असणे गरजेचे आहे. कारण आता काही नोकऱ्यांमध्ये काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फिटनेस फॉलो करणे गरजेचे किंवा बंधनकारक असणार आहे. याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या असणाऱ्या कामालाही होणार आहे. पुढील बातमीत आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

भारतातल्या मुख्य विमान कंपन्यांपैकी Air India कंपनीने त्यांच्या केबिन क्रूसाठी नवीन हेल्थ आणि फिटनेस पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि ड्युटी रोस्टरवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 मेपासून लागू होणाऱ्या या पॉलिसीनुसार केबिन क्रूचा बॉडी मास इंडेक्स (BMI) आणि त्यांची एकूण फिटनेस तपासला जाणार आहे. कंपनीने 18 ते 24.9 या BMI ला सामान्य आणि योग्य श्रेणी मानले आहे. 18 पेक्षा कमी BMI असलेले कर्मचारी अंडरवेट समजले जातील अशी माहिती समोर आली आहे. पण त्यांनी मेडिकल तपासणी आणि फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर त्यांना काम सुरू ठेवता येईल.

तसेच 25 ते 29.9 BMI असलेल्यांना ओव्हरवेट मानले जाईल. अशा कर्मचाऱ्यांना काम करण्याची संधी दिली जाईल, पण त्यासाठी त्यांना फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होणं आवश्यक असेल. जर 30 किंवा त्यापेक्षा जास्त BMI असेल, तर थेट स्थूल (Obese) श्रेणीत टाकण्यात येणार असून, अशा कर्मचाऱ्यांना ड्युटी रोस्टरमधून काढलं जाण्याची शक्यता आहे. या पॉलिसीनुसार, ज्यांचं वजन ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त किंवा कमी असेल, त्यांना काही काळासाठी ड्युटीवरून लांब ठेवलं जाईल. त्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. जर त्यांनी ही चाचणी पास केली नाही, तर त्यांचा पगारही थांबवला जाऊ शकतो. विशेषतः स्थूल श्रेणीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात स्पष्ट केलं आहे की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश हेल्दी लाइफस्टाइलबद्दल जागरूकता वाढवणे आणि केबिन क्रूला योग्य फिटनेस स्टँडर्ड पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. ही पॉलिसी सध्या एक प्रकारची तयारी असून, भविष्यात जास्त कडक नियम लागू केले जाऊ शकतात. तसेच हे नियम सध्याच्या आणि प्रशिक्षण घेत असलेल्या दोन्ही केबिन क्रू सदस्यांवर लागू असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

SCROLL FOR NEXT