Bank Loan Saam Tv
बिझनेस

Bank Loan: स्टेट बँकेनंतर 'या' सरकारी बँकेने केली व्याजदरात मोठी कपात; होम लोन होणार स्वस्त

Bank Of Maharashtra Interest Rate: स्टेट बँकेनंतर आता अजून एका सरकारी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने व्याजदरात मोठी कपात केली आहे.

Siddhi Hande

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर होम लोनचे व्याजदर आपोआप कमी झाले आहेत. अनेक बँकांनी होम लोनवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेनेही व्याजदर कमी केले आहेत. स्टेट बँकेनंतर आता बँक ऑफ महाराष्ट्रनेदेखील होम लोनवरील व्याजदर कमी केले आहेत. (SBI Interest Rate)

बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांना दिलासा दिला आहे. गृह कर्ज, कार लोन आणि इतर कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. ०.५० टक्क्यांनी व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे आता होम लोन स्वस्त होणार आहे. (Bank Of Maharashtra Cut Interest Rates)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तब्बल ५ वर्षांनी रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेटवर व्याजदर ठरवले जाते. रेपो रेट जेवढा कमी तेवढे व्याजदर कमी असते. त्यामुळे अनेक दिवसांपासून रेपो रेट कमी होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. दरम्यान, अनेक बँकांनी व्याजदर कमी केले आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. रेपो रेट ६.२५ टक्के झाली आहे. बँकेच्या होमलोनचा बेंचमार्क हा ८.१० टक्क्यांपर्यंतखाली आला आहे. हे बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी व्याजदर आहे. कारलोनवरील व्याजदर ८.४५ टक्क्यांपर्यंत आले आहे. तसेच शैक्षणिक कर्ज आणि इतर कर्जदेखील स्वस्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षकांच्या वेतनात बदल, साताऱ्यात होणार IT पार्क; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Smartphone 2026: 6500mAh बॅटरी अन् 50MP सोनी सेन्सर; दमदार फिचर्ससह Motorola Edge 70 Pro लाँच, किंमत वाचा

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Riteish and Genelia: 'लालपरी'ला नवं ग्लॅमर! रितेशभाऊ अन् जिनिलिया वहिनी MSRTC चे नवे ब्रँड अॅम्बेसिडर

Beed : बीडमध्ये संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीचा बालविवाह, ६ महिन्यांच्या गरोदर पीडितेचा जबरदस्ती गर्भपात

SCROLL FOR NEXT