Ladki Bahin Yojana update  Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

Ladki Bahin Yojana update : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याविषयी मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Vishal Gangurde

राज्यातील हजारो लाडक्या बहिणी यंदा मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने चिंतेत आहेत. मात्र, मंत्री आदिती तटकरे यांनी मे महिन्याच्या हप्ता पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याचे जाहीर केले होते. अनेक महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष मे महिन्याचे हप्त्याकडे लागलं आहे. यादरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची अपडेट हाती आली आहे.

अनेक लाडक्या बहिणी मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने तक्रारी करत आहेत. बहुतांश लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही. लाडक्या बहिणींच्या हप्त्याविषयी मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

मंत्री आदिती तटकरे म्हणाले, 'लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण आणि नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही प्रक्रिया राबवली जातेय. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली आहे. तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही'.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT