AadhaarUpdate  Google
बिझनेस

Aadhaar Update: आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा दुरुस्त

UIDAI Mobile Application: UIDAI च्या नवीन मोबाईल अ‍ॅपमुळे आधार कार्डवरील मोबाईल नंबर, पत्ता, नाव व ई-मेल घरबसल्या काही मिनिटांत सुरक्षितपणे अपडेट करता येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

आधार कार्डधारकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलू शकणार आहात. तसेच तुम्हाला पत्ताही बदलता येणार आहे. UIDAI ने नव्या आधार मोबाईल अ‍ॅपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे आधार अपडेट करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज राहणार नाही. विशेष म्हणजे, लवकरच याच अ‍ॅपद्वारे नाव, पत्ता आणि ई-मेल आयडी अपडेट करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

UIDAI ने सुरू केलेली ही डिजिटल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे. जे लोक दुर्गम भागात राहतात आणि नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती आणि स्थलांतरित कामगारांसाठी ही सुविधा मोठा दिलासा देणारी आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता नाही. मोबाईल अ‍ॅपवर ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे मोबाईल नंबर बदलता येणार आहे.

अ‍ॅपमध्ये लॉग इन करण्यासाठी आधार क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. पडताळणी झाल्यानंतर वापरकर्त्याला सहा अंकी लॉगिन पिन सेट करावा लागतो.

मोबाईल नंबर अपडेट करताना सध्याचा नंबर आणि नवीन नंबर ओटीपीद्वारे व्हेरिफाय केला जातो. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या सेवेसाठी ७५ रुपयांचे शुल्क आकारले जाते. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होते.

आधार कार्डसाठी मोबाईल नंबर अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. बँक खातं, सरकारी योजना, आयकर प्रक्रिया, डिजिलॉकरसारख्या अनेक सेवांसाठी ओटीपीची गरज असते. त्यामुळे जुना किंवा बंद मोबाईल नंबर असल्यास अडचणी येऊ शकतात. याआधी ही प्रक्रिया वेळखाऊ होती, मात्र आता UIDAI मुळे आधार अपडेट करणे जास्त सोपं आणि सुरक्षित झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT