Government Schemes saam tv
बिझनेस

Government Schemes : आधार कार्ड नाही? तरीही मिळणार सरकारी योजनांचे पैसे! फक्त हे एक कागदपत्र ठेवा जवळ

Aadhaar Card : आधार कार्ड नसलं तरी सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. दिल्ली सरकारने नवा निर्णय घेतला आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे, असं तुम्हालाही वाटतं का? मात्र, आता आधार कार्ड नसले तरी सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावं लागणार नाही. दिल्ली सरकारने नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे आधार कार्डाऐवजी मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यांसारख्या कागदपत्रांचाही वापर करता येईल. त्यामुळे आधार कार्ड नसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे दिल्ली सरकारचा नवा निर्णय?

दिल्ली सरकारने सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी युनिफाइड सिटिझन डेटा प्लॅटफॉर्म (Unified Citizen Data Platform) तयार करण्यास मंजुरी दिलेली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यापूर्वीच या योजनेची घोषणा केली होती. आता माहिती तंत्रज्ञान विभागाकडून यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

आधार कार्ड अनिवार्य असणार नाही!

या नव्या व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्डाद्वारे ओळख पडताळणी करणं ऐच्छिक असेल. आधारद्वारे पडताळणी करण्यापूर्वी नागरिकांची संमती घेणे आवश्यक असेल. एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल किंवा त्याला आधारद्वारे पडताळणी करायची नसेल, तरीही त्याला सरकारी योजना आणि सेवांचा लाभ मिळू शकेल.

कोणती कागदपत्रे चालणार?

आधार कार्डाऐवजी नागरिकांना इतर सरकारी ओळखपत्रांचा वापर करता येणार आहे.

  • मतदार ओळखपत्र (Voter ID)

  • ड्रायव्हिंग लायसन्स

  • पासपोर्ट

  • केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले इतर फोटो ओळखपत्र

नागरिकांना काय फायदा होणार?

या नव्या प्लॅटफॉर्ममुळे सरकारी योजनांमधील पारदर्शकता वााढायला मदत होईल. एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या योजनांमध्ये वारंवार लाभार्थी म्हणून नोंद होणे किंवा चुकीच्या पद्धतीने सरकारी मदत घेणे रोखता येईल. तसेच सरकारी योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सरकारला सोपे होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंबे येथील विहीर दुर्घटनेतील चौघांचे मृतदेह सापडले; २४ तासांनंतर शोधमोहीम समाप्त

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 मोठे अपडेट! पगारवाढीबाबत आली महत्त्वाची बातमी

Ramayana: बॉक्स ऑफिसवर रणबीरच्या 'रामायण'ची महागर्जना! ११ व्या दिवशी कमावले ७५ कोटी, केला 'धुरंधर'चा चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक

जय शाह यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी! दुसऱ्यांदा ICC अध्यक्षपदी बिनविरोध निवड, आता क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल?

Migraine Home Remedies: मायग्रेनचा त्रास होताच तुम्हीही करता का हे घरगुती उपाय? डॉक्टरांनी सांगितलं, कोणते उपाय खरंच ठरतात फायदेशीर!

SCROLL FOR NEXT