Aadhaar Card Update Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेटच्या नियमांत बदल; सर्व कामे होणार ऑनलाइन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Aadhaar Card Update Rules: आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आधार कार्ड अपडेट तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. यामुळे तुमची कामे काही मिनिटात होणार आहेत.

Siddhi Hande

आधार कार्ड अपडेटच्या नियमांत बदल

आधार पॅन कार्ड लिंक करायची डेडलाइन

केवायसीच्या प्रोसेसमध्ये बदल

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड हे अनेक सरकारी कामांसाठी आवश्यक आहे. दरम्यान, तुम्हाला आधार कार्डमध्ये काही माहिती बदलायची असेल किंवा अपडेट करायचे असेल तर त्यासंबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता आधारसंबंधित सर्व कामे डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामासाठी ऑफलाइन पद्धतीने आधार सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही आधार अपडेट, व्हेरिफिकेशन, पॅन कार्ड लिंक अशी सर्व कामे ऑफलाइन पद्धतीने घरबसल्या करु शकतात.

आधारसंबंधित सर्व कामे आता ऑनलाइन

UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आता आधार कार्डधारक नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर ही सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर जाऊन अपडेट करु शखतात. यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असणार आहे.

आधार पॅन लिंकिंगची नवी डेडलाइन (Aadhaar Pan Link Deadline)

आता सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही यापूर्वी आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. त्यामुळे तुम्हाला हे काम करावेच लागणार आहे.

केवायसी प्रोसेस

UIDAI ने केवायसी प्रोसेसमध्येही बदल केले आहेत. आता तुम्ही आधार ओटीपी, व्हिडिओ केवायसी किंवा इन पर्सन व्हेरिफिकेशन पूर्ण केले जाईल. यामुळे केवायसी प्रोसेस ही आधीपेक्षा सुरक्षित होईल.

आधार अपडेट फीमध्ये बदल

UIDAI ने १ नोव्हेंबरपासून आधार अपडेटच्या फीमध्ये बदल केले आहेत. आधार रिप्रिंटसाठी ४० रुपये द्यावे लागणार आहे. बायोमेट्रिक डेटा अपडेटसाठी १२५ रुपये तर डेमोग्राफिक अपडेटसाठी ७५ रुपये द्यावे लागणार आहे. होम एनरोलमेंटमध्ये पहिल्या सदस्यासाठी ७०० रुपये द्यावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

WhatsApp मध्ये मोठा बदल, आई-वडिलांकडे राहणार तुमच्या प्रत्येक चॅटची माहिती; कसं ते वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT