aadhaar card download Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card: आधारकार्ड अपडेट करणं झालं आणखी सोपं; घरबसल्या कागदपत्राशिवाय करा झटपट काम

Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्ड अपडेट करणे आणखी सोपे झाले आहे. आता तुम्ही घरबसल्या कोणत्याही कागदपत्राशिवाय आधार कार्डवरील फोन नंबर बदलू शकतात.

Siddhi Hande

आधार कार्ड अपडेट करणे आणखी सोपे

कोणत्याही कागदपत्राशिवाय करा मोबाईल अपडेट

नवीन आधार अॅपमुळे काम झाले सोपे

आधार कार्ड अपडेटच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता आधार कार्डवरील माहिती तुम्हाला अवघ्या काही मिनिटांत अपडेट करता येणार आहे. तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन ही माहिती अपडेट करु शकतात. तुम्हाला आता घरबसल्या मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे. तुम्हाला आता मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही.

UIDAIने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला घरबसल्या आधार कार्ड अपडेट करता येणार आहे त्याचसोबत मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाहीये.

UIDAI ने नुकतेच सांगितले होते की, लवकरत घरबसल्या तुम्ही आधार कार्डवरील पत्ता बदलण्याची सुविधा सुरु करणार आहे. त्यामुळे मोबाईल नंबर अपडेट झाल्यावर पत्तादेखील बदलता येणार आहे.

UIDAI नुसार, सिस्टीम युजर्सच्या सध्याच्या किंवा नवीन मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवणार आहे. यानंतर अॅपमधील बिल्ट इन व्हेरिफिकेशनमुळे फेस ऑथेंटिकेशन होणार आहे. यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असणार आहे. यामुळे तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे द्यावी लागणार नाही.

नवीन आधार अॅप

तुम्ही नवीन आधार अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करु शकतात. यानंतर तुम्ही आधार नंबर टाकायचा आहे. यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. यानंतर तुमची प्रोफाइल तयार होईल. तुमची प्रोफाइल सुरक्षित ठेवण्यासाठी सिक्युरिटी पिन टाकावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ३१ डिसेंबरला पुण्यातील वाहतूकीत बदल

Ladki Bahin Yojana: KYC ची मुदत संपली; ४५ लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार? तुमचंही नाव आहे का?

Municipal Election : निवडणूक निकालाआधीच भाजपनं खातं उघडलं, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रेखा चौधरींची बिनविरोध निवड

Municipal elections : महापालिका निवडणुकीत महायुतीचा पोपट कुठं कुठं मेला? फुटीचा कुणाला फटका?

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, लंडनमधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS आशिष तिवारी यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT