Aadhaar google
बिझनेस

Aadhaar Card Update: मोठी बातमी! आधार बनवण्यासाठी 'हे' डॉक्यूमेंट्स आवश्यक, नवे नियम लागू, पण कोणते? वाचा...

UIDAI New Rules: UIDAI ने आधार कार्ड अपडेट आणि नवीन नोंदणीसाठी नवे नियम लागू केले आहेत. नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

आधार कार्ड हे ओळखपत्र आपल्याला शाळेपासून ते नोकरीपर्यंतच्या सगळ्याच कामांमध्ये महत्वाचं असतं. मात्र UIDAI ने आधार बनवण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. तुम्हाला जर आधार कार्ड नवीन पाहिजे असेल किंवा त्यात काही अपडेट करायची असेल तर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रं असणं गरजेचं आहे. याआधी तुम्हाला या प्रक्रियेसाठी कमी कागदपत्रे लागत होती. पण आता यात वाढ करण्यात आली आहे. याचा उद्देश हा आधार कार्ड बनवताना चुका होऊ नयेत असा आहे.

Aadhaar कार्डाचे नवे बदलेले नियम काय?

तुम्हाला आता आधार अपडेट करण्यासाठी किंवा नवीन तयार करण्यासाठी विविध कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच नवीन नियमांनुसार Child Care Institution संस्थेत राहणाऱ्या मुलांसाठी District Child Protection Officer ने दिलेलं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. हा पुरावा आता महत्वाचा मानला जाणार आहे. पहिल्यांदाच, UIDAI ने तृतीयपंथी व्यक्तींशी संबंधित कागदपत्रांनाही मान्यता दिली आहे. OCI कार्ड होल्डर्सना आधार नोंदणीच्या वेळी एक वैध परदेशी पासपोर्ट आणि OCI कार्ड दाखवणं आवश्यक असणार आहे.

Aadhaar कार्डात नाव अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

तुम्हाला आधारमध्ये नाव अपडेट करायचं असेल तर पासपोर्ट हा महत्वाचा पुरावा ठरेल. कारण यामधला फोटो, पत्ता, जन्मतारिख आणि नाव नमुद केलेले असते. तसेच PAN कार्ट, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. तर तुमचं लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. याने Aadhaar मधले नाव अपडेट करण्याची प्रोसेस सोपी होईल.

आधार कार्डात जन्मतारीख बदलण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

जन्माचा दाखला हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. पासपोर्ट, इयत्ता १०वी किंवा १२वीची गुणपत्रिका इत्यादींचाही वापर केला जाऊ शकतो.

आधार कार्डात पत्ता बदलण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

तुमचा पत्ता बदलायचा असेल तर पासपोर्ट, बँक पासबुक किंवा नुकतेच केलेले बँक स्टेटमेंट हे पुरावे लागतात.वीज, पाणी आणि गॅसची बिलं सुद्धा ग्राह्य धरले जाईल. तुमचं मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आणि घर कर किंवा मालमत्ता कराच्या पावत्या सुद्धा ग्राह्य धरल्या जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला अटक

BP - Diabetes : कडक उन्हामुळे वाढते BP अन् शुगर; कुणाला सर्वाधिक धोका?

NEET परीक्षा कधी जाहीर होणार? महत्त्वाची अपडेट समोर

NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; भाजप नेत्याला अटक, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

Swapna Shastra Tips: 'ही' ५ स्वप्ने चुकूनही कुणाला सांगू नका

SCROLL FOR NEXT