Aadhaar Card Update Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card Update: आता फुकटात करा आधार कार्ड अपडेट ; फक्त या स्टेप्स करा फॉलो

Aadhaar Card Update Process: जर तुमचे आधार कार्ड १० वर्षांपेक्षा जास्त काळ अपडेट केले नसेल तर ते अपडेट करणे गरजेचे आहे. तुम्ही मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात.

Siddhi Hande

Aadhaar Card Free Update: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड हे १० वर्षांनी अपडेट करायचे असते. तुम्ही तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करु शकतात. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२४ आहे. तुम्ही मुदतीपूर्वी मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फक्त १९ दिवस उरले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करावे. दरम्यान, यापूर्वी आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२४ होती. ही तारीख वाढवून १४ डिसेंबर झाली आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागाने सांगितले आहे की, आधार कार्डवरील कोणतीही माहिती तुम्ही अपडेट करु शकतात. १४ डिसेंबरपर्यंत तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो अपडेट करु शकतात. ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करु शकतात.

आधार कार्ड अपडेट

UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही आधार कार्ड १० वर्षांपेक्षा जास्त काळ अपडेट केले नाही तर ते नक्कीच अपडेट करा. याचे अनेक फायदे तुम्हाला मिळणार आहे. तुमची सध्याची माहिती त्यात अपडेट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. त्याचसोबत आधार वेरिफिकेशनची माहितीदेखील तुम्ही अपडेट करु शकतात.

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट

सर्वप्रथम तुम्ही UIDAIच्या myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर जाऊन लॉर इन करावे.

यानंतर माय आधार हे सेक्शन चेक करा. त्यानंतर अपडेट आधार या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर अपडेट आधार डिटेल्सवर जा. यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा.

यानंतर क्रेडिंशियल टाका. त्यानंतर आधार कार्ड आणि कॅप्चा कोड टाकावा. यानंतर ओटीपीदेखील टाका.

तुम्ही तुमच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीवरुन लॉर इन करु शकतात.

यानंतर अपडेट ऑप्शनवर जाऊन तुम्ही नाव, पत्ता या गोष्टी अपडेट करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT