8th Pay Commission Salary Calculation: सध्या कर्मचाऱ्यांची आठव्या वेतन आयोगाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. वेतन कधी लागू होईव आणि त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होणार, याची वाट कर्मचारी आणि पेन्शनधारक पाहत आहेत. नव्या वेतन आयोगात पगारवाढ किती होईल, हे प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून राहणार आहे. सध्या कर्मचारी संघटनांकडून २.८६ ते ३.२५ पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे. पण जर सरकारने सातव्या वेतन आयोगाप्रमाणे २.५७ फिटमेंट फॅक्टर कायम ठेवला, तर पगाराचे गणित कसे बदलेल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगाराला एका ठरलेल्या गुणकाने गुणून नवीन बेसिक पगार ठरवण्याची पद्धत. सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे किमान बेसिक पगार, ७,००० वरून १८,००० झाला होता.
जर आठव्या वेतन आयोगातही २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू झाला, तर लेव्हल १ मधील १८,००० बेसिक सॅलरीचे नवीन बेसिक ४६,२६० होऊ शकते. म्हणजेच बेसिकमध्ये २८,२६० ची वाढ होईल. लेव्हल ४ मध्ये २५,५०० बेसिक असलेल्या कर्मचाऱ्यांचा नवीन बेसिक ६५,५३५ होऊ शकतो. लेव्हल ६ मधील ३५,४०० बेसिक पगाप ९०,९७८ पर्यंत जाऊ शकतो. तर लेव्हल १० मधील ५६,१०० बेसिक पगार असलेल्या अधिकाऱ्यांचे नवीन बेसिक १,४४,१७७ होण्याची शक्यता आहे.
पण ही फक्त संभाव्य गणना आहे. प्रत्यक्ष टेक-होम पगाप यापेक्षा वेगळा असू शकतो. कारण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर DA, HRA आणि इतर भत्त्यांची रचना बदलू शकते. नवीन वेतन आयोग लागू होताना विद्यमान DA शून्य करून नव्या बेसिक पगारावर त्याची गणना सुरू केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.