8TH PAY COMMISSION: BIG SALARY HIKE FOR CENTRAL GOVERNMENT EMPLOYEES FROM 2026 saam tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ९ दिवसात लागू होणार ८वा वेतन आयोग, किती वाढणार तुमचा पगार?

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाच्या सुधारणांमुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जानेवारी २०२६ पासून पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • ७व्या वेतन आयोगाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार

  • १ जानेवारी २०२६ पासून ८वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता

  • वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी ७ व्या वेतन आयोगाचा कालावधी औपचारिकपणे संपत आहे. यामुळे आठव्या वेतन आयोगाबद्दल अपेक्षा वाढत आहेत. केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२५ मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता दिली आहे. दरम्यान आयोगाला वेतन, भत्ते आणि पेन्शनबाबतच्या शिफारसी सरकारला सादर करण्यासाठी सुमारे नोव्हेंबर २०२५ पासून सुमारे १८ महिन्याचा कालवधी देण्यात आलाय.

सरकारी कारभाराची परंपरा आपण पहिली तर वर्षाच्या सुरुवातीपासून नवीन वेतन प्रणाली लागू केली जाते. त्यामुळे १ जानेवारी २०२६ पासून नवीन वेतन प्रणाली लागू केली जाईल, असा अंदाज आहे. परंतु त्यादिवसापासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार नाहीये. तज्ञांच्या मतानुसार, वेतन आयोग लागू होणे आणि वाढवून पगार मिळण्याच्या वेळेत मोठा फरक असतो.

सातव्या वेतन आयोगादरम्यानही अशीच परिस्थिती उद्भवली होती. जानेवारी २०१६ पासून हा पगार लागू करण्याचा विचार करण्यात आला होता, परंतु जूनमध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यानंतरच नवीन पगार आणि थकबाकी मिळण्यास सुरुवात झालीय.

पगार किती वाढेल?

आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार किती वाढू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडलाय. अद्याप कोणतेही अधिकृत आकडे नाहीत, परंतु मागील आयोगांच्या आधारे अंदाज लावले जात आहेत. सहाव्या वेतन आयोगाने सरासरी ४०टक्के वाढ दिली तर ७व्या वेतन आयोगाने सुमारे २३-२५टक्के वाढ दिली. यात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. आठव्या वेतन आयोगाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार २० टक्के ते ३५टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरात आचारसंहिता भंग करणाऱ्यावर पोलिसांनी केलेली कारवाई

पुण्यात मतदानाआधीच खळबळ उडवणारी घटना, अजित पवारांच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यासाठी भाजप हायकोर्टात

खळबळजनक! लिंबू, काळी बाहुली, उमेदवाराचा फोटो...; नेरूळमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीखाली जादूटोण्याचा प्रकार

Mumbai Local: गुड न्यूज! हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवास होणार गारेगार; २६ जानेवारीपासून एसी लोकल धावणार; वाचा वेळापत्रक

Hirvya Mugachi Bhaji: अस्सल गावरान पद्धतीची हिरव्या मुगाची भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT