8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ३६,००० रुपयांनी वाढण्याची शक्यता; आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जर फिटमेंट फॅक्टर ३ झाला तर लेव्हल १ कर्मचाऱ्यांच्या पगारात ३६,००० रुपयांची वाढ होऊ शकते.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

फिटमेंट फॅक्टर किती होणार?

लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा पगार ३६००० रुपयांनी वाढण्याची शक्यता

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे. यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.ही समिती शिफारसी तयार केल्या जाणार आहे. यासाठी १८ महिन्यांची मुदत दिली आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते.

मागच्या ६व्या आणि ७व्या वेतन आयोगासाठी लागू केलेल्या पगाराच्या रचनेवर नवीन फिटमेंट फॅक्टर तयार केला जाणार आहे. सहाव्या वेतन आयोगात एंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांचा पगार ६६०० ते ८०,००० रुपयांपर्यंत झाली. सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू केला होता. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार १८००० ते २,५०,००० रुपयांपर्यंत निश्चित केला होता. याचसोबत वर्षाला ३ टक्क् इंक्रिमेट दिले जाते.

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ (8th Pay Commission Salary Hike)

आता आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अधिसूचना लागू होण्यास अजून वेळ लागू शकतो. दरम्यान, कर्मचाऱ्यांची संघटनांची मागणी अशी आहे की, फिटमेंट फॅक्ट ३.० ते ३.२५ मध्ये असावा.

पगाराचे कॅल्क्युलेशन

आठव्या वेतन आयोगात जर फिटमेंट फॅक्टर ३ ठेवला तर लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा पगार १८,००० रुपयांवरुन ५४,००० रुपये होऊ शकते. लेव्हल १ कर्मचाऱ्यांच्या पगारात ३६,००० रुपयांची वाढ होईल. लेव्हल १८ कर्मचाऱ्यांचा पगार २,५०,००० रुपयांवर ७,५०,००० रुपये होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT