8th pay commission salary hike google
बिझनेस

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार, बेसिक सॅलरी ₹69940 होणार?

Salary Hike : 8 व्या वेतन आयोगाच्या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्यांवर चर्चा सुरु आहे. ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्याने त्यांच्या सॅलरीत ६९ हजारांनी वाढ होऊ शकते.

Sakshi Sunil Jadhav

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. (8th Pay Commission) आयोगाचे काम आता शेवटच्या पायऱ्यांवर आलेलं आहे. आता आयोग कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्या प्रत्येक शहरांना भेट देऊन जाणून घेत आहे. यासंदर्भात लखनऊमध्ये २२ ते २३ जून या दिवसांमध्ये बैठक घेतली जातेय. तिथे विविध मागण्यांवर चर्चा केली जातेय.

आठव्या वेतन आयोगाच्या निर्णयाने देशभरातल्या ५५ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६९ लाख पेन्शनधारकांच्या वेतनात वाढ होणार आहे. तसेच महागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांची चांदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लक्ष आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे. सध्या आयोग महागाई भत्ता, पेन्शन, आणि रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या लाभांमध्ये सुधारणा करण्यासाठी माहिती गोळा करत आहे.

सध्या सर्वात जास्त चर्चा फिटमेंट फॅक्टरची आहे. कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन नव्या वेतन संरचनेत रुपांतरित करण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. (8th pay commission calculator)७ व्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट लागू केला होता. त्यामुळे बेसिक सॅलरी ही ७००० रुपयांवरून १८००० रुपयांपर्यंत वाढली होती.

आता काही कर्मचारी संघटनांनी ८ व्या वेतन आयोगाकडे ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. ही मान्य जर मान्य केली तर सध्याच्या १८००० रुपयांच्या बेसिक सॅलरीत ६८,९४० रुपयांनी म्हणजेच ६९ हजार रुपयांची वाढ होऊ शकते. ही कर्मचारी मागणी आहे पण आयोगाने यासंदर्भात कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

स्मार्ट मीटरच्या अफवांवर महावितरणचे स्पष्टीकरण; नेमकं काय सांगितलं?

VIRAL VIDEO: वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला अन्...हायवेवरचा थरार, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Makeup Tips: घाम किंवा पावसामुळे मेकअप होणार नाही खराब! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शेताला पाणी देऊन आलो म्हणाले अन् दुकानात आढळला मृतदेह, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT