8th Pay Commission meta ai
बिझनेस

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! १८ हजारांचा बेसिक पगार थेट ६९ हजार रुपये होणार? बेसिक सॅलरीचे 'हे' गणित पाहाच

8th Pay Commission Salary Hike : आठव्या वेतन आयोगात ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी होत असून, यामुळे १८,००० बेसिक पगार जवळपास ६९,००० रुपये होऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठ्या पगारवाढीची अपेक्षा आहे. चेन्नई येथे झालेल्या बैठकीदरम्यान एका पेन्शनर्स संघटनेने बेसिक सॅलरी ६९,००० रुपये करण्याची मागणी केली आहे. सध्या सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० आहे. त्यामुळे ६९,००० रुपयांची मागणी मंजूर झाल्याने सध्याच्या बेसिकमध्ये तब्बल ५१,००० रुपयांची वाढ होऊ शकते.

या मागणीमागे ३.८३ फिटमेंट फॅक्टरचा आधार आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक सॅलरीला नव्या वेतनश्रेणीत रुपांतरिक करण्यासाठी वापरला जाणारा गुणक . सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर मंजूर करण्यात आला होता. आता आठव्या वेतन आयोगासाठी अनेक कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांकडून ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे. १८,००० बेसिकला ३.८३ ने गुणल्याने ६८,९९४, म्हणजेच जवळपास ६९,००० होते.

ही मागणी फक्त एका संघटनेपुरती मर्यादित नाही. NC-JCM, All India Defence Employees Federation (AIDEF), Federation of National Postal Organisations तसेच विविध पेन्शनर्स संघटनांनीही ६९,००० रुपये बेसिक सॅलरी आणि ३.८३३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. Chennai GPO Pensioners कडून ६८,००० किमान वेतन आणि ३.७७ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली होती. मात्र सरकारने २.५७ फिटमेंट फॅक्टर मंजूर केला होता.

मात्र संघटनांनी केलेली मागणी आणि सरकारकडून मंजूर होणारी अंतिम शिफारस यात मोठा फरक असू शकतो. सातव्या वेतन आयोगाच्या वेळी NC-JCM ने ३.७१ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली होती. मात्र सरकारने २.५७ फिटमेंट फॅक्टर मंजूर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curly Hair Care Tips: कर्ली केस फ्रिझी होऊ नयेत म्हणून करा 'या' ७ गोष्टी; कर्ल्स दिसतील परफेक्ट आणि सुंदर

Maharashtra News Live Update: लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना थेट टोला; म्हणाले, ‘अजून बच्चा आहेस, आधी अभ्यास कर!’

PF Withdrawal Rule: आपत्कालीन परिस्थितीत PF मधून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या 9 नविन नियम

Hair Removal : चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी कोणता पर्याय बेस्ट? शेव्हिंग, थ्रेडिंग की वॅक्सिंग?

Manoj jarange: मनोज जरांगेंना मोठा दिलासा, हायकोर्ट म्हणाले- 'त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार'; कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT