8th Pay Commission Saam tv
बिझनेस

8th Pay Commission: ₹५७,००० बेसिक सॅलरी, वर्षाला ७ टक्के पगारवाढ; आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये बेसिक सॅलरी ५७,००० करण्याचे सांगितले जात आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

कर्मचारी संघासोबत होणार बैठक

कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. आता याबाबत बैठका सुरु झाल्यात आहेत. जॉइंट कंसल्टेटिव्ह मशीनरीअंतर्गत नॅशनल काउंसिलची ड्राफ्ट कमिटीसोबत बैठक होणार आहे. यामध्ये १.२ कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. यामध्ये कर्मचारी आपल्या मागण्या सांगण्यात आहेत.

मीटिंगचे उद्दिष्ट काय?

ही मीटिंग होणे फार गरजेचे आहे. यामध्ये कर्मचारी संघ आपल्या मागण्या सांगणार आहेत. यामध्ये स्ट्रक्चर्ड कंसल्टेशन सुरु करण्याआधी मागण्या मांडल्या जाणार आहेत.सध्या नॅशनल काउन्सिच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. अनेक फेडरेशनने याबाबत नाराजी व्यक्त करुन दाखवली आहे.

कर्मचारी संघाच्या म्हणण्यांनुसार, सरकारने मागण्या सांगितल्या आहेत. त्याची कोणतीही गोष्ट टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये दिलेली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे या बैठका होणार आहेत.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या का?

फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनने मल्टी लेव्हल फिटमेंट फॅक्टर लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

लेव्हल १ते ५ साठी ३.०० फिटमेंट फॅक्टर

लेव्हल ६ ते १२साठी ३.०५ ते ३.१० फिटमेंट फॅक्टर

लेव्हल १३ ते १५साठी ३.०५ ते ३.१५ फिटमेंट फॅक्टर

लेव्हल १६ ते १८साठी १८ ते ३.२५ पर्यंत फिटमेंट फॅक्टर

सॅलरी स्ट्रक्चर

लेव्हल १ ते ५ नुसार बेसिक सॅलरी ५४,००० ते ८७,६०० होण्याची शक्यता

लेव्हल ६-१२ नुसार सॅलरी १,०८,००० ते २,४४,३००

लेव्हल १३ ते १५ नुसार ३,६१,५०० ते ५,७४,००० रुपये

७ टक्के वार्षिक इंक्रिमेंट

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या ३ टक्के वार्षिक पगारवाढ मिळत आहे. ही पगारवाढ वाढण्याची मागणी केली जाणार आहे. दरवर्षी ७ टक्के पगारवाढ मिळावी, अशी मागणी कर्मचारी फेडरेशनने केलेली आहे.

फॅमिली यूनिट ५ सदस्यांचा करण्याची मागणी

सध्या फॅमिली युनिटमध्ये ३ सदस्यांच्या आधारे पगार दिला जातो. ही संख्या आता वाढवून ५ करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT